21.1 C
New Delhi
Sunday, March 23, 2025
Homeमनोरंजनबाहुबली पुन्हा येतोय! 

बाहुबली पुन्हा येतोय! 

पण कटप्पाने दिला दगा,

एस. एस. राजामौलींचा ‌’बाहुबली‌’ हा भारतातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या फ्रँचायझीचा पहिला भाग तुफान हिट झाला होता. त्यानंतर लोक दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत होते. दुसरा भागही तसाच हिट झाला. या चित्रपटातील सगळीच पात्र खूप लोकप्रिय झाली होती. पण त्यातील मुख्यत: बाहुबली आणि कट्टपा ही पात्र विशेष लोकप्रिय झाली. या दोन्ही भागात बाहुबली आणि भल्लालदेव यांच्यात दुष्मनी तर कट्टपाचे आपला भाचा बाहुबलीवर असलेलं प्रेम या गोष्टींनी लक्ष वेधलं. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. हिच पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
बाहुबली, महिष्मती, कट्टपा आणि भल्लालदेव ही पात्र पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. डिस्ने+ हॉटस्टारवर ‌’बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड‌’ हा ऍनिमेटेड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच ‌’बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड‌’ या फिल्म फ्रँचायझीच्या प्रीक्वेलची घोषणा झाली आहे. या चित्रपटात बाहुबली आणि भल्लालदेव, माहिष्मती राज्यापासून सेनापती ‌’रक्तदेव‌’ हे नवे पात्र सामील झाले आहे.
‌’बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड‌’ या चित्रपटात एक खूप मोठा ट्विस्ट आहे. या चित्रपटात बाहुबली आणि भल्लालदेव मिळून महिष्मती राज्याचं रक्षण करताना दिसून येणार आहेत. तर आधीच्या चित्रपटात बाहुबलीचा भक्त असलेला कट्टप्पाच आता शत्रुसैन्यात जाऊन त्याच्याविरुद्ध लढताना दिसणार आहे. या मोठ्या ट्विस्टमुळे हा चित्रपट पाहणं अधिक रंजक ठरणार आहे.
‌’बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड‌’ ही ऍनिमेटेड फिल्म ग्राफिक इंडिया आणि अर्का मीडियानं बनवली आहे. तर त्याची निर्मिती प्रसिद्ध चित्रपट निर्माते एस.एस. राजामौली, शरद देवराजन आणि शोबू यारलागड्डा, जीवन जे दिग्दर्शित आणि निर्माते. कंग आणि नवीन जॉन यांनी केली आहे. हा ॲक्शन-पॅक चित्रपट १७ मे २०२४ पासून Disney+ hotstar वर पाहता येणार आहे. आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.
या ऍनिमेटेड फिल्ममध्ये एका मराठी अभिनेत्याचीही महत्वाची भूमिका असणार आहे. अभिनेता शरद केळकरने बाहुबली चित्रपटात प्रभासच्या पात्राला आवाज दिला होता. बाहुबलीचं हिंदी डबिंग शरद केळकरने त्याच्या आवाजात केलं होतं. त्यामुळे आता ‌’बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड‌’ या चित्रपटातही शरद केळकरचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
21.1 ° C
21.1 °
21.1 °
64 %
1kmh
0 %
Sat
25 °
Sun
34 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!