27.7 C
New Delhi
Friday, July 11, 2025
Homeमनोरंजनबेरोजगारी आणि जॉब स्कॅम वर  भाष्य करणारा 'श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन' चित्रपट   गणेशोत्सवात ...

बेरोजगारी आणि जॉब स्कॅम वर  भाष्य करणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपट   गणेशोत्सवात  होणार प्रदर्शित

– मराठी सण – उत्सवाला माराठी चित्रपट बघितले पाहिजे दिग्दर्शक अजिंक्य उपासनी यांचे आवाहन

बेरोजगारी आणि जॉब स्कॅम हे आपल्या देशातील आजचे ज्वलंत विषय आहेत. अगदी हातावर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी हजारोंच्या घरात अर्ज येतात हे समाजातील भयान वास्तव आहे. त्यातच नोकरभरातीतील भ्रष्टाचार आणि पेपरफूटी प्रकरण तर नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या प्रवासातील मोठे अडथळे ठरत आहेत. तर दुसरीकडे मराठी माणूस म्हटल की तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे. आपल्या सभोवताली अनेक बेरोजगार मराठी तरूण स्वतःचा छोटा, मोठा व्यावसाय सुरू करण्याचा प्रयत्न न करता नोकरी शोधण्याच्या मागे लागलेले दिसतात. याच संवेदनशील विषयावर भाष्य करणार  ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट यंदाच्या गणेशोत्सवात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

उत्तेजना स्टूडिओज प्रा. लि.  निर्मित ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये जनक सिंह आणि समीर रंधवे हे दोघे झुंजारू उद्योजक त्यांच्या कॅफेच्या शाखा विस्तारण्यासाठी  एका  गुंतवणूकदाराच्या शोधात असल्याचे दिसते. जनकच्या सभ्य व्यक्तिमत्वामध्ये आणखी  एक पैलू दडलेला आहे, तो  रात्रीच्या अंधारात ए. के. नावाच्या गुन्हेगाराचा शोध घेत आहे.  त्याला पकडायला जनक सिंह कुठल्याही थरापर्यंत जाण्यास तयार आहे. तर कोण आहे हा ए. के ? आणि जनक त्याला का शोधतोय? तसेच त्यांचा काय संबंध आहे? हे जाणून घेण्याची उत्कंठा मराठी प्रेक्षकांना आता लागल्याचे दिसते.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अजिंक्य उपासनी म्हणाले, आम्ही मराठी माणसांसाठी एका संवेदनशील मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी माणसे दिवाळी, ख्रिसमस अशा वेळेस हिंदी किंवा अन्य चित्रपट बघत असतात. यंदा आम्ही खास मराठी प्रेक्षकांसाठी गणेशोत्सवात संवेदनशील मराठी चित्रपट घेऊन येत आहोत. मराठी माणसांची टिपिकल प्रतिमा बदलणारा आणि मराठी युवकांना प्रेरणा देणार हा चित्रपट ठरेल अशी अपेक्षा आहे.

अभिनेते गौरव उपासनी म्हणाले, आजच्या तरुणाईला आवडेल असा एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट आम्ही आणला आहे. बॉलीवूड, दाक्षिणात्य अशा चित्रपटांची कॉपी न करता मराठी माणसांना भावेल, आपला वाटेल असा आपल्या मातीतला सिनेमा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. संवेदनशील विषयाची उत्कंठावर्धक मांडणी असलेला आमचा थ्रीलरपट तरुणाईच्या पसंतीस उतरेल असा विश्वास आहे.

डॉ. पार्थसारथी आणि सौ. प्रेरणा उपासनी यांनी ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  चित्रपटात अभिनेता गौरव उपासनी, अथर्व देशपांडे, वैभव रंधवे, सायली वैद्य, संपदा गायकवाड, सर्वेश जोशी आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन, छायांकन, संकलन, पटकथा अशी तिहेरी जबाबदारी अजिंक्य उपासनी यांनी लीलया पेलली आहे. चित्रपटाची कथा गौरव उपासनी यांची असून या चित्रपटासाठी संवाद लेखनही त्यांनी केले आहे. तर या चित्रपटाला संगीत व पार्श्वसंगीत  सुमेध मिरजी यांचे लाभले आहे. नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा सस्पेन्स थ्रीलर  ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट येत्या ६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
27.7 ° C
27.7 °
27.7 °
76 %
1.6kmh
67 %
Thu
27 °
Fri
37 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!