18.1 C
New Delhi
Sunday, December 1, 2024
Homeमनोरंजनराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

‘वाळवी’ ठरला सर्वोकृष्ट मराठी सिनेमा…

७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची  १६ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आले आहेत. यावेळी प्रशांत नीलच्या KGF या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर ‘गुलमोहर’ या सीरिजसाठी मनोज वाजपेयीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’साठी प्रीतमला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘कांतारा’ चित्रपटासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार आणि नित्या मेनन, मानसी पारेखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर मराठी चित्रपट वाळवीला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.

प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांची (National Film Awards) घोषणा आज करण्यात आली आहे. यंदाचे हे या पुरस्कारांचं ७० वे वर्ष आहे. गेल्या एका वर्षात अनेक दमदार सिनेमांनी , कलाकरांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या पुरस्कारांवर कोणाचं नाव कोरले जाणार याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागले होतं.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन असलेल्या वाळवी (Vaalvi) सिनेमाला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तसेच साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला बेस्ट डॉक्यु्मेंटरी आणि बेस्ट नॅरेशन असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच सचिन सुर्यवंशी यांच्या वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर आदीगुंजन या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम निवेदन पुरस्कार, सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

वाळवी हा सिनेमा १३ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते, सुबोध भावे अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
18.1 ° C
18.1 °
18.1 °
63 %
1kmh
0 %
Sun
22 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!