10.1 C
New Delhi
Tuesday, January 14, 2025
Homeमनोरंजनरितेश देशमुख-जेनेलिया देशमुख यांचा मजेदार रिल व्हायरल

रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख यांचा मजेदार रिल व्हायरल

सोशल मीडियावरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे फक्त चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर सोशल मीडियावरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा त्यांच्या मजेदार रिल्सने चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत असतात. अलीकडेच या जोडप्याने एक मजेदार रील बनवला आहे. आता या रिलवर चाहत्यांसह सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर हा रिल शेअर केला आहे. रिलची सुरुवात रितेशपासून होते. यामध्ये तो 1997 च्या रोमँटिक-कॉम ‌’मिस्टर अँड मिसेस खिलाडी‌’ मधील जुही चावलाच्या ‌’अकेला है मिस्टर खिलाडी‌’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख शेअर केला रिल : यानंतर या रिलमध्ये जेव्हा जेनेलिया येते, तेव्हा ती एका हुशार पत्नीची भूमिका करते. रितेशचे गाणे बीवी नंबर 1 मध्ये बदलते. तिच्या पतीला त्यावर रील बनवण्यास सांगते. हा रिल शेअर करत जेनेलियानं लिहिलं, ”सामान्य नवरा रितेशबरोबर बीबी नंबर 1.” ‌’मिस्टर ॲन्ड मिसेस खिलाडी‌’ अभिनेत्री जुही चावलानेही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने कमेंट विभागात हसणारा इमोजी पोस्ट केले आहेत. जुही व्यतिरिक्त हंसिका मोटवानी, मुश्ताक शेख आणि जय भानुशाली या कलाकारांनी पोस्टवर सुंदर अशा कमेंट्‌‍स केल्या आहेत. रितेशचा हा रिल अनेकांना आवडत आहेत.चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव : या पोस्टवर एका चाहत्याने लिहिले, ”रितेश आणि जेनेलिया या दोघांची जोडी हिट आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले, ”तुम्ही नंबर 1 आहात. रितेश सर देखील नंबर 1 पती आहात. तुम्ही दोघेही नंबर 1 जोडपे आहात.” आणखी एकानं लिहिलं, ”जेनेलिया तर कोहिनूर आहे. तिच्यासारखी अभिनेत्री चित्रपटसृष्टीत नाही” याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून या जोडप्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत. रितेश आणि जेनेलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो ‌’राजा शिवाजी‌’, ‌’हाऊसफुल 5‌’, ‌’मस्ती 4‌’, ‌’विसफोट‌’ आणि ‌’रेड 2‌’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे जेनेलिया ही ‌’ज्युनिअर‌’ या कन्नड चित्रपटात दिसणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
10.1 ° C
10.1 °
10.1 °
100 %
2.6kmh
100 %
Tue
22 °
Wed
22 °
Thu
19 °
Fri
22 °
Sat
20 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!