35 C
New Delhi
Tuesday, July 8, 2025
Homeमनोरंजननिसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी

निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी

'बंजारा'चा टीझर प्रदर्शित

मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उलगडून भावनिक प्रवास घडवून आणणारा ‘बंजारा’ चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर banjara officeal teaser प्रदर्शित झाला आहे. ‘बंजारा’ (banjara) हा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण सिक्कीमसारख्या निसर्गरम्य ठिकाणी झाले आहे. सिक्कीमच्या १४ हजार फूट उंच पर्वतरांगांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून, हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. वी. एस. प्रॉडक्शन्स आणि मोरया प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांनी केले आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव (bharat jadhav), सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे  (sneha ponkshe), सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

नुकत्याच झळकलेल्या टीझरमध्ये तीन मित्रांची मोटरसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे. मात्र यात दोन वेगळ्या जनरेशन्सच्या मित्रांचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहे. विशेष म्हणजे, शरद पोंक्षे (sharad ponkshe), भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडी लुक यात दिसत आहे. सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवासप्रेमींना आकर्षित करणारी ठरेल. या मित्रांचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार, हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

निर्माते शरद पोंक्षे म्हणतात,” ‘बंजारा’ हा माझ्या अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे. या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे, ते प्रत्येकाला भावेल, असा विश्वास आहे. सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशन्सवर शूटिंग करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्कीच अनुभवता येतील. ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल. कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टेल्जिक बनून अशा सहलीचे आयोजनही करतील.

B | bharat jadhav |

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतात,” ‘बंजारा’ ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आपल्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे. या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उलगडणारे जीवन यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा देईल, अशी आशा आहे. प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो, हेच ‘बंजारा’चे वेगळेपण आहे. जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहाण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणारा आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
35 ° C
35 °
35 °
54 %
2.9kmh
17 %
Tue
39 °
Wed
38 °
Thu
30 °
Fri
37 °
Sat
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!