32.1 C
New Delhi
Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रअण्णा भाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन - शरद पवार

अण्णा भाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन – शरद पवार

विश्वास पाटील यांच्या “अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर" पुस्तकाचे प्रकाशन

पुणे-       मराठी प्रसिद्ध साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी लिहलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्यावरील “अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर” या चरित्र ग्रंथाचा इंग्रजी व हिंदी अनुवाद असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे प्रमुख उस्थिती भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे vinod tawade, साहित्य अकादमीचे सचिव डॉ. श्रीनिवास राव, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा, चांगुलपणाची चळवळीचे राज देशमुख, आंबेडकर चळवळीचे नेते महेश शिंदे, सावित्रीच्या लेकी अध्यक्षा मंजिरी घाडगे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव वैराट हे होते. या प्रसंगी  खासदार मेधा कुलकर्णी,  जलसा वैराट, प्रशांत जगताप prashant jagatapआदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक भगवानराव वैराट म्हणाले की अण्णा भाऊंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा. अण्णा भाऊंचे साहित्य क्षेत्रातील योगदान वाखाणण्याजोगे आहे. अशा लोकशाहीर होणे नाही.

पवार म्हणाले की पाटील यांनी मराठीत लिहिलेल्या “अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान” या चरित्र ग्रंथांची देशपातळीवर साहित्यिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर नोंद घेतली गेली आहे. अण्णाभाऊंचे विशेषत: दलित साहित्यातील मोठे योगदान आणि त्यांनी आपल्या साहित्याद्वारे विविध स्तरातील भारतीय स्त्री जगताच्या मांडलेल्या व्यथा आणि वेदना यामुळे  हा ग्रंथ संशोधन व वाचनाच्या अंगाने कमालीचा लोकप्रिय ठरलेला आहे. राजहंस प्रकाशनने मराठीत प्रकाशित केलेल्या या ग्रंथाच्या तीन आवृत्या आधीच प्रकाशित झालेल्या आहेत. पुणे विद्यापीठासह अनेक पुरस्कार या ग्रंथास लाभलेले आहेत. दिल्लीच्या  प्रसिद्ध वाणी प्रकाशनने नुकताच  हा  ग्रंथ हिंदीमध्येही प्रकाशित केलेला आहे.

कसबे म्हणाले की विश्वास पाटील लिखित आणि केंद्र साहित्य अकादमी दिल्ली मार्फत प्रकाशित हा ग्रंथ सर्वोत्तम आहे. पाटील यांनी अतिशय सखोलपणे अभ्यास करून हा ग्रंथ लिहला आहे. अण्णांच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला. अण्णा भाऊंचे कार्य नेहमी लक्षात राहील.

तावडे म्हणाले की विश्वास पाटील vishawas patil यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. पानिपत या कादंबरीतून त्यांनी मराठ्यांची शौर्यगाथा मांडली आहे. या कादंबरीने  मराठ्यांचा गौरव वाढवला.  अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहणे आवश्यक आहे.  अण्णाभाऊंचं व्यक्तिमत्त्व आणि दुर्लक्षित झालेले त्यांचा साहित्य या दोन्हीची दखल केवळ महाराष्ट्रातील नाही तो संपूर्ण देशात घेतली पाहिजे. ते पुढे म्हणाले  हिंदी आणि इंग्रजीमध्ये झालेले प्रकाशन देशाच्या अन्य भाषा सुद्धा भाषांतर झालं पाहिजे ही जबाबदारी मी घेईन.

राव म्हणाले की स्वातंत्र्योत्तर काळातील अण्णाभाऊंचे साहित्यातील राष्ट्रीय योगदान अधोरेखित करणारा हा ग्रंथ इंग्रजीमध्ये दिल्लीच्या केंद्रीय साहित्य अकादमीने प्रकाशित केला आहे. या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथाच्या प्रकाशनाने
अण्णाभाऊंचे साहित्य संपूर्ण भारतातील वाचकांसाठी आता इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये उपलब्ध झाली आहे.

चौकट

अण्णाभाऊंनी स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान मोठे – पवार

अण्णाभाऊंचे वादळी जीवन आणि वैश्विक दर्जाचे लेखन लक्षात घेऊन त्यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा किताब मिळण्यासाठी मी विशेष प्रयत्न करेन. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सातारा आणि कराड येथील स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान आहे अण्णाभाऊंनी देखील स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांनी लिहिलेली छक्कड “माझी मैना गावावर राहिली” ही आज देखील प्रत्येकाला प्रेरणा देते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
32.1 ° C
32.1 °
32.1 °
53 %
4kmh
91 %
Sat
32 °
Sun
38 °
Mon
33 °
Tue
36 °
Wed
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!