17.1 C
New Delhi
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रअभिनेत्री सई मांजरेकरच्या उपस्थितीत रंगली दहीहंडी

अभिनेत्री सई मांजरेकरच्या उपस्थितीत रंगली दहीहंडी

-शिवसाई ज्योत गोविंदा पथक चेंबूर ने फोडली दहीहंडी

पिंपरी – चिंचवड : गोविंदा रे गोपाळा …., गो गो गोविंदा .., एक दोन तीन चार हमाल पुरातील पोर हुशार.., हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की .., असे म्हणत भर पावसात एम्पायर इस्टेट युवा मित्र मंडळ, चिंचवड येथील आयोजित मानाची दहीहंडी साजरी झाली. शिवसाई ज्योत गोविंदा पथक चेंबूर या दहीहंडी पथकाने तब्बल 5 थर लावून तिसऱ्या प्रयत्नात ही दहीहंडी फोडली. यावेळी ‘दंबग -3’ फेम अभिनेत्री सई मांजरेकर हिची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सई ने ‘गुलाबी साडी… अन् लाली लाल… ‘ या गाण्यांवर ठेका धरला.
आई एकविरा गोविंदा पथक, चुनाभट्टी, चेंबूर हे देखिल या दहीहंडीचे विशेष आकर्षण ठरले. ही दहीहंडी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. 

यावेळी एम्पायर इस्टेट युवा मित्र मंडळाचे संस्थापक, आकाश चतुर्वेदी उपस्थित होते. समाजसेवेला वाहून घेतलेल्या आकाश चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर अनेक समाज उपयोगी उपक्रम घेतले जातात. यामध्ये आरोग्य शिबिरे, रक्तदान मोहिम, वृक्षारोपण मोहिम, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन आदींचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
51 %
2.1kmh
0 %
Wed
21 °
Thu
25 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!