36.1 C
New Delhi
Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रअहिंसाच जगाला शांतीचा मार्ग दाखवेलप्रसिद्ध लेखक प्रा.शेफी किडवई यांचे विचार

अहिंसाच जगाला शांतीचा मार्ग दाखवेलप्रसिद्ध लेखक प्रा.शेफी किडवई यांचे विचार

. डॉ. सदानंद मोरे लिखित नेक निहाद सो नेक निहायत या उर्दु काव्य संग्रहाचे प्रकाशन

पुणे ः”सृष्टीवर ज्यांनी मोठ्या प्रमाणात हिंसा केली आहे त्यांनाच हिरो समझल्या जात आहे. परंतू या सर्व गोष्टींना तिलांजली देऊन सर्वाना दूर राहणे गरजेचे असून पुस्तकांच्या जगात वावरणे महत्वाचे आहे. अहिंसाच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकते आणि त्यातूनच शांतीचे विश्व निर्माण करावयाचे आहे.” असे विचार प्रसिद्ध लेखक प्रा.शेफी किडवई यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि समर्थ मिडिया सेंटरतर्फे लेखक प्रा. डॉ. सदानंद मोरे लिखित नेक निहाद सो नेक निहायत या उर्दु काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी मौलाना डॉ. सय्यद कल्बे राशिद रिजवी व लेखक डॉ. सदानंद मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्रकाशक मनिषा बाठे व प्रा. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
प्रा.शेफी किडवई म्हणाले,”सृष्टीवर मोठ्या प्रमाणात हिंसा वाढतांना दिसत आहे. या काळामध्ये लेखकाने उर्दु कवितेच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे कार्य केले आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, कबिर सारख्या संतांची विचार धारा कवितेमध्ये मांडली आहे. कविंने परिवर्तनकारी हदय स्पर्शी कविता लिहिल्या आहेत.”
डॉ. सदानंद मोरे म्हणाले,” समाजात धार्मिक सलोखा निर्माण होणे गजरेचे आहे. हे अधिक दृढ व्हावे या विचार संचनातून उर्दु मध्ये लेखन केले आहे. कवितेतून अंतरधर्मीय सुसंवाद साधण्याचा समाजाला प्रभावी विचार देण्याचा प्रयत्न केला. मानवी विकास व एकात्मते साठी हा अट्टाहास आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले, ” मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हे सूत्र लक्षात ठेऊन जीवन व्यतीत करावे. या उर्दु पुस्तकाच्या माध्यमातून कवि ने धर्माचा खरा अर्थ मांडला आहे. लेखकाने मानवतेचा मार्ग दाखविणारी कविता लिहून हिंदी साहित्यात आपले बहुमूल्य योगदान दिले आहेत.”
मौलाना डॉ. सय्यद कल्बे राशिद रिजवी म्हणाले,”भाषेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकसूत्रात बांधू शकतो. या संवेदनाला उर्दुच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य होऊ शकते. चांगला व्यक्ती जगाला चांगूलपण देणारा असतो. कवि आणि शायर हे साहित्याच्या माध्यमातूनच समाजाला नवी दृष्टी देऊ शकतात.”
प्रा.राहुल विश्वनाथ कराड यांनी पुस्तक निर्मितीची पार्श्वभूमी सांगितले. तसेच डॉ. कराड यांनी विश्वशांतीची जी ज्योत पेटविली आहे ती पुढे नेण्याचे काम या विद्यापीठाच्या माध्यमातून केले जाईल.
स्वागत पर भाषण प्रा.धिरज सिंग व प्रास्ताविक मनिषा बाठे यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ. शालिनी टोंपे व आभार प्रा. मिलिंद पात्रे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
36.1 ° C
36.1 °
36.1 °
4 %
4.2kmh
0 %
Wed
36 °
Thu
41 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!