पुणे-डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे येथील यंत्र अभियांत्रिकीचे प्राध्यापक आणि स्कूल ऑफ इंजिनीयरिंग अँड टेकनॉलॉजिचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. गणेश मा. काकांडीकर यांना इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशन (आयएसटीई), नवी दिल्लीच्या “महाराष्ट्र स्टेट नॅशनल अवॉर्ड फॉर दि आऊटस्टँडिंग रिसर्च वर्क डन बाय टीचर्स ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस २०२३” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशन हि भारतातील अभियांत्रिकी/तंत्रनिकेतन प्राध्यापकांची सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे. भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल टेकनॉलॉजि विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशनच्या ५३ व्या वार्षिक अधिवेशनात त्यांना सन्मानित करण्यात आले. आयएसटीई चे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रतापसिंह देसाई, कलिंगा इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल टेकनॉलॉजिचे संस्थापक प्रा. डॉ. अच्युत सामंता, कलिंगा इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल टेकनॉलॉजि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सरणजित सिंह, कलिंगा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दीपक कुमार बेहरा, दोन्ही विद्यापीठांचे कुलसचिव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. संरक्षण आणि क्षेत्रासाठी उपयुक्त, मायक्रॉन लेव्हल जाडीच्या पत्र्यांपासून अत्यंत लहान वस्तू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या मायक्रो-फॉर्मिंग या तंत्रज्ञानावर आधारित संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला. या तंत्रज्ञानावर आधारित भारतीय आणि इतर देशातील तीन पेटंटस डॉ. गणेश काकांडीकर यांनी मिळविली असून यावर आधारित शोधनिबंध ही प्रसिद्ध आहेत.
इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशन,दिल्ली पुरस्कारने प्रा. गणेश काकांडीकर गौरवान्वित
RELATED ARTICLES
New Delhi
haze
28.1
°
C
28.1
°
28.1
°
74 %
0kmh
0 %
Sun
37
°
Mon
37
°
Tue
36
°
Wed
37
°
Thu
35
°