24.1 C
New Delhi
Monday, December 2, 2024
Homeमहाराष्ट्रइन्कलाब जिंदाबाद","भारत माता की जय","वंदे मातरम"

इन्कलाब जिंदाबाद”,”भारत माता की जय”,”वंदे मातरम”

भारतमातेचा जयजयकार करत महापालिकेच्या वतीने क्रांती दिन साजरा करण्यात आला.

      चिंचवड-  क्रांतीदिनानिमित्त Kranti din चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास, चिंचवड स्टेशन येथे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

चिंचवड Chinchwad येथील अभिवादन प्रसंगी माजी नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, गणेश लोंढे, सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, Ashwini chinchawade कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच अंबर चिंचवडे आणि सामाजिक कार्यकर्ते गतीराम भोईर, विजय गावडे, आप्पा भोईर, आबा गावडे, नकुल भोईर, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी कार्यकारी अभियंता नितीन देशमुख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष अण्णा कसबे, उपअभियंता विजय कांबळे आदी उपस्थित होते.

दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसदस्य रोहीत उर्फ आप्पा काटे, माजी नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, शहीद नारायण दाभाडे यांचे नातू धनंजय दाभाडे तसेच त्यांचे नातेवाईक रेखा दाभाडे, पद्मसिंह दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ जगताप, रविंद्र कांबळे, मयूर जयस्वाल, चंद्रकांत काटे, योगेश बहिरट, माता फेरपाल, मेहबूब शेख, भाऊसाहेब पठारे, मिलींद फडतरे आदी उपस्थित होते.

    चिंचवड गावातील दामोदर हरी चापेकर यांनी बाळकृष्ण आणि वासुदेव या बंधूसह पुण्यामध्ये औंध येथील गणेशखिंडीत रॅन्ड या जुलमी इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली आणि देशाच्या क्रांतीच्या इतिहासातील क्रांतीची मशाल अधिकच प्रज्वलीत केली. त्यांच्या या कृत्याबद्दल इंग्रजांनी चापेकर बंधूना आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशीची शिक्षा दिली. त्यांच्या स्मरणार्थ चिंचवड येथे हुतात्मा चापेकर चौकात चापेकर बंधू तसेच त्यांचे सहकारी रानडे यांचे समूह स्मारक बांधण्यात आले आहे.

    चिंचवड स्टेशन येथे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांचा पुतळा आहे. वस्ताद साळवे हे आद्य क्रांतीगुरू दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, निशाणेबाजी यासारख्या युद्धकलेत निपुण होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांच्या फौजा तयार केल्या होत्या.

   दापोडी येथे थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांचा पुतळा आहे. इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले. तर शहीद नारायण दाभाडे हे विद्यार्थीदशेत असताना स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील कचेरीवरील युनियन जॅक उतरवून तेथे तिरंगा लावत असताना इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात गोळी लागून शहीद झाले. त्यांच्या बलिदानामुळे देशातील स्वातंत्र्यसैनिकांना, देशप्रेमींना तसेच तरूणांना प्रेरणा मिळाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
24.1 ° C
24.1 °
24.1 °
43 %
2.1kmh
0 %
Mon
27 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
26 °
Fri
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!