35.9 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
Homeमहाराष्ट्रउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या योजना" सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या योजना” सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे- भारतीय जैन संघटनेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वाघोली यांनी आयोजित केलेल्या एसपीपीयू, पुणे अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या एम आर जयकर उद्योजकता विकास कार्यक्रमा अंतर्गत या सत्राच्या मार्गदर्शक लेखिका आणि सहायक प्राध्यापिका आणि रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया यांनी “उद्योजकांसाठी सरकारी आणि बँक योजना” आणि “उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या योजना” यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. रिता म्हणाल्या, शासन आणि बँकेच्या बऱ्याच योजना उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आहेत. याचा उद्देश नोकरी मिळवणारे न बनता तुम्ही नोकरी देणारे व्हा. सरकार ने मेक इन इंडिया , मेक फॉर इंडिया , आत्मनिर्भर भारत या संकल्पने अंतर्गत स्टार्ट अप ला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान आणि बँकेमार्फत कर्जाची सुविधा उपलब्ध केली आहे. या योजना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी अशा प्रकारे या योजनांची जनजागृती आणि याविषयीचे प्रशिक्षण द्यायला हवे. तरच योजना यशस्वी होतील. आता पर्यंतच्या योजनेचे यशापयश आणि यावरील सुधारणा यावरही त्यांनी चर्चा केली.

या सत्रास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना डॉ. रिता यांनी मार्मिक उत्तरे दिली.
यावेळी प्राचार्य डॉ. मनीषा बोरा, सहायक समन्वयक मोनिका जैन, समन्वयक श्री. डी. डी. गायकवाड, एचसी. डॉ. सविता शेटिया आणि टीवाय बीएससी आणि टीवायबीएचे विद्यार्थी सत्रासाठी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
35.9 ° C
35.9 °
35.9 °
29 %
2.9kmh
0 %
Tue
41 °
Wed
41 °
Thu
43 °
Fri
43 °
Sat
44 °

Most Popular

Recent Comments