कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमुख पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराबरोबरच मतदारांच्या चर्चेत असलेला प्रचार म्हणजे अपक्ष उमेदवार कमल ज्ञानराज व्यवहारे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे, त्याबरोबरच आमदार धंगेकर व रासने यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. सौ कमल व्यवहारे यांच्या प्रचारासाठी त्या कसबा गणपती, फडके हौद चौक, शेख सल्लाउद्दीन दर्गा परिसर, गावकोस मारुती संस्था या परिसरात त्यांच्या प्रचाराची पदयात्रा आज निघाली होती. कसब्यातील मतदारांनी सौ. कमलताई व्यवहारे यांचे औक्षण करून स्वागत केले. कमलताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत, सौ. कमलताई व्यवहारे यांचा प्रचार त्यांच्या समर्थकांनी केला. त्यांच्या किटली या चिन्हाचा प्रचार करत परिसरात जोरात प्रचार केला. त्यांच्या प्रचाराने निवडणूक रंगात आली आहे.
New Delhi
haze
12.1
°
C
12.1
°
12.1
°
66 %
1.5kmh
0 %
Thu
25
°
Fri
25
°
Sat
25
°
Sun
25
°
Mon
20
°