पुणे, : राज्यात प्रथमच कविता विषयाला वाहिलेले पहिले ‘ राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाचे’ आयोजन करण्यात येत आहे. हे संमेलन काव्यमित्र संस्था आणि अपेक्षा मासिक परिवार, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ९ फेब्रुवारी रोजी स. ९ ते संध्या. ६ वाजेपर्यंत सदाशिव पेठ येथील उद्यानप्रसाद कार्यालयात होणार आहे. अशी माहिती काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर आणि अपेक्षा मासिक परिवारचे संस्थापक संपादक दत्तात्रय उभे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९.३० वा. होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक सुरेश कोते व अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका व उद्योजिका सौ. चंद्रलेखा बेलसरे आहेत. उद्घाटक म्हणून पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिटयुट्सचे संस्थापक/चेअरमन श्री.राजेंद्र बांदल असतील.
तसेच ज्येष्ठ समाजसेवक श्री. नंदकुमार वाळंज उर्फ बाबुजी, समाजसेवक व मा.कृषीअधिकारी श्री.सुरेश लुणावत, मनपा शिक्षण मंडळाच्या निवृत्त केंद्र प्रमुख श्रीमती उज्वला बडदरे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य श्याम भुर्के व ज्येष्ठ संपादक श्री.दिनकर शिलेदार आणि सेवाभावी उद्योजक श्री.सुशिल बियाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
काव्यमित्र संस्था आणि अपेक्षा मासिक परिवार, पुणे यांच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचे औचित्य साधून हे संमेलन होत आहे. यामध्ये चार सत्रात दोन कविसंमेलने, यामध्ये हास्य कवी संमेलन, कविता किंवा काव्य विश्वावर आधारित परिसंवाद, जीवन गौरव पुरस्कार, साहित्यगौरव पुरस्कार, विशेष कृतज्ञता सन्मान, अपेक्षा मासिक आणि काव्यमित्र संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीविषयी एका स्मरणिकेचे प्रकाशन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काव्य क्षेत्राच्या प्राचीन ,ऐतिहासिक व वैभवशाली परंपरेचा मागोवा, सद्यःस्थितीतील काव्य विश्वाची वाटचाल, मराठी साहित्य विश्वातील दिग्गज कवींचे महान योगदान अशा
अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल. यानिमित्ताने कवींना विशेषत:
नवोदित कवींना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे व काव्यविश्वाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या ‘ कवी संमेलनाचे’ अध्यक्षपद ज्येष्ठ कवी व गझलकार डॉ.डी.बी. इंगळे भूषवितील. यामध्ये जवळपास २४ निमंत्रित कवी व कवयित्रींचा सहभाग असणार आहे.
दुपारी २ ते ३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘काव्यविश्व आणि मराठी कवितेची वाटचाल’ या परिसंवादाचे अध्यक्षपद साहित्यिका व नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजा डॉ. शीतल मालुसरे भूषविणार आहेत. या सत्रात सुप्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते व समीक्षक प्रा. विजय लोंढे आणि ज्येष्ठ समाजसेविका व साहित्यिका प्रा. अनघा ठोंबरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. युवा कवयित्री व निवेदिका कु. साक्षी सगर या सूत्रसंवादक असतील.
दुपारी ३ ते ४.३० वा. जीवन गौरव व साहित्य गौरव पुरस्कार आणि विशेष कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात येतील. अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. सुरेश वाकचौरे असतील. माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. प्रकाश तुरबतमठ, श्री क्षेत्र म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.मधुरा भेलके आणि प्रसिद्ध सर्जन डॉ. संजय शिवदे उपस्थित राहणार आहेत.
संध्याकाळी ४.३० ते ५.३० वा. हास्य कविसंमेलन होईल. ज्येष्ठ कवी बाळकृष्ण बाचल हे अध्यक्ष असतील. प्रमुख पाहुणे म्हणून एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू व प्रमथेश जंगम असतील. यावेळी गणेश पुंडे, श्रीराम घडे, देवेंद्र गावंडे, आय. के. शेख, शामराव सरकाळे, जयवंत पवार आणि विभिषण पोटरे हे हास्य कविता सादर करतील.
संमेलनाचा समारोप सायं. ५.३० वा. होणार आहे.
काव्यविश्व साहित्य संमेलन
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
18.6
°
C
18.6
°
18.6
°
23 %
1.2kmh
9 %
Tue
29
°
Wed
28
°
Thu
26
°
Fri
28
°
Sat
30
°