पुणे-: निसर्गवासी कौस्तुभ फाउंडेशनची निसर्गाशी असलेली बांधिलकी कौतुकास्पद असून प्रा. भवारी यांनी आपल्या समाजाचा इतिहास जपत केलेले उत्तम लेखन त्याची पावती आहे. विविध माध्यमांतून मानवाचे निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन एसएनडीटी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी केले. निसर्गावासी कौस्तुभ भवारी याच्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. विजयकुमार भवारी लिखित ‘कोळी महादेव: सह्याद्रीच्या आदिवासींचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. सुरेंद्र निरगुडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. विद्यार्थ्यांशी बांधिलकी आणि विषयाची उत्तम जाण असणारे प्रा. भवारी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कौटुंबिक दुःखांवर मात करीत आपली अभिव्यक्ती लेखनातून कशाप्रकारे सादर केली जाऊ शकते, याचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला आहे, असे गौरवोद्गार प्रा. निरगुडे यांनी काढले.
आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात प्रा विजयकुमार भवारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच आपल्या लेखनामागील भूमिका विशद केली. तत्पूर्वी, डॉ. संजय भवारी यांनी आपल्या सूत्रसंचालनादरम्यान कौस्तुभ फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेत पुढील उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास कौस्तुभ फाउंडेशनचे संस्थापक मा. विनायक भवारी, संस्थेचे पदाधिकारी, मित्रपरिवार, भवारी कुटुंबीय, तसेच प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कौस्तुभ फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी: प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे
RELATED ARTICLES
New Delhi
haze
21.1
°
C
21.1
°
21.1
°
64 %
1kmh
0 %
Sat
25
°
Sun
34
°
Mon
37
°
Tue
39
°
Wed
39
°