तळेगाव दाभाडे,- बंजारा सेवा संघ मावळच्यावतीने येत्या १५ फेब्रुवारी संत गुरु सेवालाल महाराजांच्या २८६ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, तसेच बंजारा समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील बंजारा समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक अध्यक्ष हिरा जाधव, अध्यक्ष महादेव राठोड, उपाध्यक्ष चंदू राठोड, सचिव अमरजीत चव्हाण, खजिनदार राजू पवार यांनी केले आहे.
यनिमित्त तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी आठ वाजता जिजामाता चौक ते सुशीला मंगल कार्यालया दरम्यान रथयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व भोग होणार आहे. यावेळी आयोजित मेळाव्याचे उदघाट्न निवृत्त पुणे जिल्हा न्यायाधीश नामदेव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, आमदार सुनील शेळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. दीपप्रज्ज्वलन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते, तर माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे व मार्ग फाउंडेशन सोलापूरचे अध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते बापूरो भोग संपन्न होणार आहे. यावेळी मावळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड, तळेगाव नगरपरिषदेच्या अधिकारी ममता राठोड, मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, विजापूर जिल्हा परिषद स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रामभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरु सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
RELATED ARTICLES
New Delhi
haze
21.1
°
C
21.1
°
21.1
°
64 %
1kmh
0 %
Sat
25
°
Sun
34
°
Mon
37
°
Tue
39
°
Wed
39
°