चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांच्या आवडीचे बॉण्ड आयोजित ‘झेप’ प्रदर्शन’ या वर्षी १९ व २० ऑक्टोबर २०२४ ला चिंचवडे लॉन, चिंचवड येथे सकाळी १० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. सर्व लहान व मोठ्या उद्योगांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळवा त्यांच्या उद्योगांना चालना मिळावी या हेतूने दरवर्षी दिवाळीपूर्व हे प्रदर्शन आयोजित केले जाते. यामध्ये 100 हून अधिक स्टॉलचे भव्य प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. नेहमीच झेप प्रदर्शनास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. यंदाच्या वर्षी देखील खाद्य पदार्थापासून ते कपड्यांपर्यंत सर्व काही एका छताखाली उपलब्ध होणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.दिवाळीच्या निमित्ताने महिला वर्गांमध्ये खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनात खरेदी करण्याची पर्वणीच ग्राहकांना मिळणार असल्याचे आयोजकाडून सांगण्यात आले आहे.
प्रदर्शनात अनेक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवेश व पार्किंग फ्री असणार आहे.
तरुणाईच्या आवडते 360 डिग्री,सेल्फी कॉर्नर,सेल्फी बूथ तर असेलच त्याच बरोबर नेल आर्ट, मेहंदी अश्या ॲक्टिव्हिटी ही असणार आहेत.दिवाळी साठी लागणारी प्रत्येक वस्तू इथे रास्त भावात मिळणार आहे.याच बरोबर खुप मोठी खाऊ गल्ली हे या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून या प्रदर्शनात 5 स्टॉल वेगळे असणार आहेत गोंद आदिवासी नागझरा जंगल,भंडारा येथे बनवलेल्या अनेक वस्तू , संपूर्ण बांबू केंद्र, मेळघाट या संस्थेच्या बांबू च्या वस्तू , ऊर्जा प्रतिष्ठान भोसरी च्या अंध मुलांनी रंगवलेल्या पणत्या,पुनरुत्थान गुरूकुलम ,चिंचवड या संस्थे मधील मुलांनी बनवलेल्या वस्तू तसेच छात्र प्रबोधन,पुणे चा स्टॉल हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट आहे. उत्तम दर्जाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन बॉण्ड ग्रुपच्या वतीने केले आहे.
