मंगळवेढा– राज्यातील दोन लाख 42 हजार दिव्यांग विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षणाची सोय करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र स्तरावर 4860 पदांची निर्मिती करून त्यावरती राज्यातील 2 समग्र शिक्षा अभियान ,माध्यमिक शिक्षण योजना व प्राथमिक अपंग एकात्म युनिट मधील एकूण 2974 शिक्षकांना कायमस्वरूपी समायोजन करण्याचा निर्णय घेतला. दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला तदनंतर दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला या प्रयत्नाचा पाठपुरावा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याचे आमदार सन्माननीय अभिमन्यू पवार यांनी केला होता. त्यानिमित्त राज्यातील विशेष शिक्षकांनी त्यांचा कृतज्ञता सोहळा विजय मंगल कार्यालय, औसा जिल्हा- लातूर येथे आयोजित केला होता. राज्यातील सर्व विशेष शिक्षक आणि आमदार महोदयांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला त्यामध्ये आंधळगाव , तालुका -मंगळवेढा ,जिल्हा -सोलापूर येथील विशेष शिक्षक श्री. अमोल कुलकर्णी यांची कन्या कु.अनुष्का कुलकर्णी हिने मनोगतामध्ये व्यक्त केलेल्या भावनांमुळे अख्खे सभागृह भावनिक होऊन गहिवरून गेले. मा. आ. अभिमन्यू पवार व त्याच्या पत्नीचे यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्यांनी व त्यांच्या पत्नीने कु. अनुष्का कुलकर्णी हिचा सत्कार करून खूप कौतुक केले आणि तिच्या वक्तृत्व कलेची खूप प्रशंसा केली तसेच या वक्तृत्वाबद्दल तिच्या पालकांचे देखील खूप खूप आभार मानले.
