पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था आणि दलित स्वयंसेवक संघातर्फे आचार्य रतनलाल सोनग्रा लिखित अण्णाभाऊंच्या सहवासात या पुस्तकाचे प्रकाशन अण्णाभाऊंचे मित्र सुप्रसिद्ध चित्रकार नाथ वैराळ यांच्या पत्नी सौ. कुसमताई वैराळ यांच्या हस्ते करण्यात आले. या नगरपालिकेत सफाई कामगार होत्या.
या प्रसंगी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, बिहारच्या भागलपूर विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता साहित्यिक लखनलाल सिंह आरोही, दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष दादासाहेब सोनावणे व शाहिर जाधव हे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षिय भाषणात डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले,”अण्णाभाऊ साठे यांनी भारतातील प्रगतीशिल साहित्य परंपरेचे ओळख करून देऊन प्रेमचंद पासून तर शाहीर लुधियानी पर्यंत या लेखकांनी पुरोगामी विचारांची क्रांती साहित्यात केली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे देखिल याच परंपरेचे जागतिक कीर्तीचे महत्वाचे सहित्यीक होते. त्यांच्या कादंबर्या आणि कथा वेगवेगळ्या भाषेत अनुवाद झाले आहे.”
आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले,”संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून माझ्या त्यांच्याशी संबध आला. त्यांचा कलापथकांचे पप्रययोग आणि प्रसार अहमदनगरजिल्ह्यात करण्यात माझा सहभाग होता. फकीरा चित्रपटाच्या वेळी अकोला गावात मी आणि माझे सहकारी संपूर्णपणे अण्णाभाऊंच्या बरोबर होतो. चित्रकार एकनाथ वैराळ अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अण्णाभाऊंच्या बरोबर होते. शेवटचा टाटा करीत अण्णाभाऊंनी जो निरोप घेतला तो देखील त्यांनी या पुस्तकात मांडला आहे.”
हे पुस्तक दलित सेवक संघाचे अध्यक्ष आणि मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्त मा. दादासाहेब सोनावणे यांना अर्पण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नटश्रेष्ठ कुमार अहेर यांनी केले.
भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाल.
या कार्यक्रमात शाहीर जाधव, शाहीर गायकवाड, लेखिका सुमा लोंढे, चार्लीन चापलीनची भूमिका करणारे आयुष्यमान वनप्रभ, बौद्ध नेते अशोक प्रियदर्शी, सौ. सुशील सोनग्रा, आदी उपस्थित होते.
जागतिक समताधर्माची जुळणी केल्याने अण्णाभाऊंचे साहित्य – वैश्विक आचार्य रतनलाल सोनग्रा
अण्णाभाऊंच्या सहवासात” पुस्तकाचे प्रकाशन
RELATED ARTICLES
New Delhi
haze
21.1
°
C
21.1
°
21.1
°
64 %
1kmh
0 %
Sat
25
°
Sun
34
°
Mon
37
°
Tue
39
°
Wed
39
°