31.3 C
New Delhi
Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रज्ञानदान हे श्रेष्ठदान - शांतीब्रह्म ह.भ.प मारोती महाराज कुऱ्हेकर

ज्ञानदान हे श्रेष्ठदान – शांतीब्रह्म ह.भ.प मारोती महाराज कुऱ्हेकर

भोसरी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

पिंपरी,-भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळाच्या ज्ञानाचे क्षेत्र असलेली शाळा ही एक अशी पुण्यनगरी आहे जेथे मोठे मोठे ज्ञानी व्यक्ती होऊन गेले. ज्ञानदान हे श्रेष्ठदान आहे. या ज्ञानासाठी जागा हवी, इमारत हवी असते. या शाळेत आज भूमिपूजन करण्याचे भाग्य मला लाभले यात मी धन्य धन्य झालो. स्वामी विवेकानंदांसारखे विद्यार्थी या भारतभूला लाभले हे आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे असे शांतीब्रह्म हभप मारोती महाराज कुऱ्हेकर यांनी या भूमिपूजनास शुभाशीर्वाद दिले. 

      भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभाग, महात्मा फुले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन शांतीब्रह्म गुरुवर्य हभप मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या हस्ते भोसरी येथे करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेशदादा लांडगे, संस्थेचे अध्यक्ष वसंत नाना लोंढे, सचिव संतोष लोंढे, उपाध्यक्ष अनिल लोंढे, विश्वनाथ लोंढे,  सुरेश तात्या म्हेत्रे, योगेश लोंढे, शुभांगी लोंढे, सुरेखा लोंढे, विलास मडेगिरी, नम्रता लोंढे, सोनाली गव्हाणे, शंकर देवरे, हनुमंत लोंढे, सखाराम लोंढे, शाम गायकवाड, मुरलीधर साठे, शरद कर्णवर, दिगंबर ढोकले, मुख्याध्यापक मोहन वाघुले, मुख्याध्यापिका सुलभा चव्हाण, मंगल आहेर आदी उपस्थित होते. 

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा दिल्या.

    आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, छोट्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात होते. महात्मा फुले शाळा ही त्यापैकी एक आहे. लोंढे, रासकर कुटुंबीय आणि वसंत नानांच्या मेहनतीने या शाळेची दिवसेंदिवस प्रगती झाली आहे. येथे शिक्षणाबरोबरच संस्कार शिकवले जातात. विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, जबाबदारी, परंपरा कळायला हवी. याचे संस्कार शाळेत दिले जातात.  या शाळेचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे आ. महेशदादा लांडगे म्हणाले.

    संस्थेचे अध्यक्ष वसंत लोंढे यांनी सांगितले की, १९८८ साली महात्मा फुले महाविद्यालय स्थापन झाले. दिवसेंदिवस विद्यार्थी वाढत गेले, त्यामुळे हे नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात येत आहे. शाळा मुलांना चांगले संस्कार देतेच आहे, परंतु पालकांची ही जबाबदारी आहे की मुलांना संस्कार देण्यामध्ये सहाय्य करावे. सहकाराशिवाय काही साध्य होत नाही. तेव्हा नेहमी एकमेकांना सहकार्य करा. असे वसंत लोंढे यांनी सांगितले.     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर ढोकळे, आभार रामचंद्र लोंढे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
31.3 ° C
31.3 °
31.3 °
40 %
5.2kmh
1 %
Tue
39 °
Wed
41 °
Thu
42 °
Fri
42 °
Sat
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!