24.1 C
New Delhi
Monday, December 2, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याकडून चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुक

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याकडून चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुक

चंद्रकांतदादांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाचे भरभरुन करत, कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला असल्याचे गौरवोग्दार काढले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढायला सुरुवात झाली आहे. कोथरुडचे आमदार आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आज चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी चंद्रकांतदादांनी आपल्या गत पाच वर्षाच्या कार्याचा कार्य अहवाल डॉ. माशेलकर यांच्याकडे सादर केला, तो त्यांनी सविस्तर पाहिला. पाच वर्षांत केलेल्या कामांची यादी आणि उपक्रम पाहून डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांत दादांचे मनापासून कौतुक केले. यावेळी चंद्रकांतदादांच्या कोथरुड मधील आरोग्य विषयक योजनांची डॉक्टरांनी आवर्जून माहिती घेतली.

कोथरुड ही राज्याची संस्कृतिक राजधानी आहे. इथे प्रत्येक व्यक्तीची एक वेगळीच ओळख आहे. खरंतर एखादा व्यक्ती विशेष करुन राजकीय व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचल्यावर त्याच्या स्वभावातही फरक पडतो. विनयशिलता, नम्रपणा कमी होतो. पण चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्यालातील विनयशीलता, नम्रपणा आणि समाजाप्रती समर्पित होऊन काम करण्याचा गुण सोडलेला नाही. गेल्या पाच वर्षात चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून कोथरुडकरांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या रुपाने कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या गुरु पौर्णिमेनिमित्तच्या गुरुपूजन उपक्रमाचेही भरभरुन कौतुक केले. तसेच, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे हे देखील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
24.1 ° C
24.1 °
24.1 °
43 %
2.1kmh
0 %
Mon
27 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
26 °
Fri
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!