23.1 C
New Delhi
Saturday, March 22, 2025
Homeमहाराष्ट्रदीड वर्षाच्या आमदारकीच्या काळात केलेल्या कामामुळे आपल्यावरील मतदारांचा विश्वास वाढला!

दीड वर्षाच्या आमदारकीच्या काळात केलेल्या कामामुळे आपल्यावरील मतदारांचा विश्वास वाढला!

पुणे- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत येथील मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवून मला निवडून दिले. या आमदारकीच्या जेमतेम दीड वर्षाच्या काळात आपण या मतदारसंघात जे काम केले त्यामुळे मतदारांचा आपल्यावरील विश्वास आणखीनच दृढ झाला असून, त्यातूनच आपल्याला पुन्हा पाच वर्षासाठी निवडून देण्याचा निर्णय येथील मतदारांनी घेतला आहे, असे प्रतिपादन काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले. कसबा मतदार संघात जो विकासाचा मोठा बॅकलॉग राहिला आहे तो येत्या पाच वर्षात आपण निश्चित भरून काढू आणि मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू असे प्रतिपादनही धंगेकर यांनी काल प्रभाग क्रमांक 17 येथील पदयात्रेच्या वेळी मतदारांशी संवाद साधताना केले.आमदार धंगेकर यांनी आमदारकीच्या काळात केलेली लोकोपयोगी कामे, तसेच त्याआधीही बरीच वर्ष नगरसेवक म्हणून केलेली कामे याचे आम्ही साक्षीदार आहोत, त्यामुळे आम्ही खंबीरपणे धंगेकर यांच्याच पाठीशी पुन्हा उभे राहणार अशी ग्वाही अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी यावेळी धंगेकर यांना दिली.कसबा मतदारसंघातील सर्व जाती धर्मातील मतदार मोठ्या उत्साहाने धंगेकर यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत, त्यातून यंदा पोट निवडणुकीपेक्षाही मोठा विजय यावेळी साकारला जाणार आहे असा विश्वास महाविकास आघाडीतील सर्वच स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष आणि अन्य मित्र पक्षांचे पदाधिकारी यावेळी पदयात्रेत सहभागी झाले होते.धंगेकर यांनी कामगार मैदानापासून पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी पद्मशाली समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना समर्थन देण्यात आले. त्यानंतर ही पदयात्रा पालखी विठोबा मंदिर, डोके तालीम, घोडेपीर, नाना चावडी चौक, हिंदमाता चौक, कुंभारवाडा, रामोशी गेट, बनकर तालीम, घसेटी पूल, सतरंजीवाला चौक, तांबोळी मशीद, नेहरू चौक आदी मार्गाने काढण्यात आली.

  • यावेळी पदयात्रेत रवींद्र माळवदकर, वीरेंद्र किराड, चंद्रकांत मिठापल्ली, रवि रच्चा, विशाल धनवडे, सुनील पडवळ, नितीन गोंधळे, हेमंत येवलेकर, भाई कात्रे, योगेश आंदे, विशाखा निंबाळकर, शिवराज माळवदकर इत्यादी सहभागी झाले होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
53 %
1kmh
0 %
Sat
26 °
Sun
35 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!