25.2 C
New Delhi
Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रधंगेकरांना दिलेले मत महाराष्ट्राच्या सार्थकी लागेल-शांतीलाल सुरतवाला

धंगेकरांना दिलेले मत महाराष्ट्राच्या सार्थकी लागेल-शांतीलाल सुरतवाला

धंगेकरांच्या पाठीशी उभे राहण्यात केवळ कसब्यातील लोकांचेच नव्हे, तर पुणेकरांचेही हित!

पुणे- आ. रवींद्र धंगेकर यांना केवळ १६ महिन्यांचीच आमदारकी मिळाली;पण या अवधीत त्यांनी ससूनमधील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणून संपूर्ण महाराष्ट्रातील मादक द्रव्यांच्या तस्करीवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडले. त्यांची ही कामगिरी महाराष्ट्राच्या आणि तरुण पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत हितकारी ठरली. त्यामुळे धंगेकर यांना आपण दिलेले मत संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्थकी लागते, असा विश्वास त्यातून निर्माण झाला आहे.त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी धंगेकरांनाच मतदान करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी केले आहे.सुरतवाला यांनी यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, धंगेकर यांनी ससूनमधील मादक द्रव्य गैरव्यवहाराचे जे रॅकेट उघडकीस आणले, त्यातून पाच पोलीस निलंबित झाले. याची पाळेमुळे राज्यभर असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. त्यावर कारवाई करून या प्रकाराला आळा घातला गेला. धंगेकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे यश लाभले आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.पुण्यातील पोर्शे मोटार कार अपघातप्रकरणीही त्यांनी असाच आक्रमक आवाज उठवला. हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी मोठ्या पैशांची ऑफर असतानासुद्धा धंगेकर यांनी ती धुडकावून लावून सर्वसामान्य माणसाच्या हिताचे रक्षण केले.आजच्या जमान्यात ही बाब साधी नाही. बेकायदेशीर पब्ज आणि हुक्का पार्लर यांच्याविरोधात कोणीतरी लोकप्रतिनिधींनी आक्रमक होऊन आवाज उठवायला पाहिजे होता, ती जबाबदारी धंगेकर यांनी समर्थपणे पार पाडली आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहणे हे केवळ कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्याच हिताचे नव्हे तर संपूर्ण पुणेकरांच्या हिताचे आहे असेही सुरतवाला यांनी म्हटले.

कसबा मतदार संघातील ब्राह्मण समाजाने गेल्या पोटनिवडणुकीत आपले पारंपारिक पद्धतीचे मतदान बाजूला ठेवून धंगेकर यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय धंगेकर यांनी सार्थ ठरवला आहे. आपण निवडून दिलेला आमदार महाराष्ट्राच्या उपयोगी पडतो हे धंगेकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध केले आहे, त्यामुळे कसबा पेठ येथील अन्य समाजाबरोबरच ब्राह्मण समाजही धंगेकर यांच्याबरोबरच उभा राहील असा विश्वासही सुरत वाला यांनी व्यक्त केला. ज्या मतदारांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला मत देऊ नये असे आवाहन ही सुरतवाला यांनी केले.सायंकाळी नारायण पेठेतील मुरलीधर भोजनालय येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. ओंकारेश्वर मंदिर, अहिल्यादेवी शाळा, नेने घाट, मेहुणपुरा, केसरी वाडा, गरुड गणपती, भरत नाट्यमंदिर, चिमण्या गणपती असा शनिवार, सदाशिव, नारायण पेठे येथून पदयात्रा जाऊन खजिना विहीर विठ्ठल मंदिर येथे पदयात्रा समाप्त झाली. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
25.2 ° C
25.2 °
25.2 °
5 %
2.1kmh
0 %
Thu
41 °
Fri
42 °
Sat
42 °
Sun
42 °
Mon
40 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!