पुणे मेट्रोच्या टप्पा -२ च्या ३१.६४ किलोमीटर मार्गिकेला महाराष्ट्र शासनाची मान्यता
खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग या पुणे मेट्रोच्या टप्पा २ मधील मार्गीकांना महाराष्ट्र शासनाची मान्यता देण्यात आली आहे. (pune metro) रोजी राज्य शासनाने पुणे मेट्रोच्या टप्पा २ मधील खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग या ३१.६४ किलोमीटर मार्गीकेला मान्यता दिली आहे. या मार्गिकांवर एकूण २८ स्थानके असणार आहेत. या दोन्ही मार्गिकांसाठी ९८९७.१९ कोटी इतका खर्च लागणार आहे. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर आज केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला गेला आहे.
खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी या मार्गिकेची लांबी २५.५१८ किमी असून, या मार्गिकेवर २२ स्थानके असणार आहेत. या मार्गिकेसाठी ८१३१.८१ कोटी इतका खर्च येणार आहे. तसेच टप्पा २ मधील नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग हा मार्ग ६.११८ किमी असून त्यात ६ स्थानके असणार आहेत. या मार्गासाठी १७६५.३८ कोटी रुपये खर्च येणार आहे. हे दोन्ही मार्ग संपूर्ण उन्नत असणार आहेत. या प्रसंगी महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, “सध्या सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता आणि सोलापूर रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे. या मेट्रोमार्गिकांमुळे तेथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या भागातील नागरिकांना पिंपरी चिंचवड, रामवाडी, वनाझ आणि स्वारगेट इत्यादी ठिकाणी जलद व सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे.”
पुण्याची मेट्रो आणखी सुसाट
आणखी दोन नवे मेट्रो धावणार!
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
26.2
°
C
26.2
°
26.2
°
87 %
3.1kmh
100 %
Mon
33
°
Tue
38
°
Wed
36
°
Thu
31
°
Fri
31
°