19.1 C
New Delhi
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातील आकाश पवार ठरले 'गौरी गणपती सजावट' चे विजेते

पुण्यातील आकाश पवार ठरले ‘गौरी गणपती सजावट’ चे विजेते

मालपाणीज् बेकलाईट तर्फे आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पारंपरिक कला सजावटीला प्रोत्साहन देणे तसेच कौटुंबिक नात्यांचे बंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मालपाणीज् बेकलाईटच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशातील इतर राज्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यातील बालाजीनगर येथील आकाश राजेंद्र पवार हे या स्पर्धेत सर्वांगिण विजेते ठरले.

गणेशोत्सव हा देशाची संस्कृती, परंपरा आणि सर्जनशीलतेचे मूर्त स्वरूप असलेला उत्सव आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्ती आपापल्या कार्यात गुंतलेली असते. लोकांना आपल्या कौटुंबिक वेळेशी तडजोड करावी लागते आणि त्यांना सर्जनशीलता दाखविण्यासाठी फारसा वाव नसतो. मात्र बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस प्रत्येक व्यावसायिक आपल्या रोजच्या दिनचर्येत बदल करतो आणि बाप्पाच्या पूजेच्या निमित्ताने आपली कलाकुसर दाखवतो. यामुळे संपूर्ण कुटुंब आणि मित्र एकत्र येतात आणि त्यांच्यातील बंध आणखी दृढ होतात. त्यालाच वाव देण्यासाठी ही “गणपती – गौरी सजावट आणि प्रसाद’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

विजेता आकाश राजेंद्र पवार म्हणाले की, यंदाचा देखावा-मुळा-मुठा सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा २०२४ पुणे, हा देखावा मी ६० दिवसात पूर्ण केला आहे. ही सोसायटी ४५ वर्ष जुनी असुन माझे बालपण या सोसायटीमध्ये गेले आहे म्हणून मी हा देखावा बनवण्याचा निर्णय यंदाच्या वर्षी घेतला आपल्या जुन्या जुन्या आठवणी दुर्मिळ होत चालल्या आहेत, म्हणून गेले १२ वर्ष आम्ही पवार कुटुंब जुन्या आठवणी वर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. हा देखावा तयार करण्यासाठी मी प्लायवुड, कार्डशीट, न्युज पेपर लेस, पुठ्ठा, चिकणमाती, रबर, आईस्क्रीमच्या स्टिकचा वापरासह मी वेगवेगळ्या कलरचा वापर सुध्दा केला आहे

आकाश पुढे म्हणाले की,याआधी मी वेगवेगळे देखावे केले आहे,जसे की, गावातील जत्रा,
मुंबईची चाळ संस्कृती, शनिवार वाडा, शंकर महाराज मठ, काचेचे मंदिर असे विविध प्रकारचे देखावे पवार कुटुंब यांनी बनवले आहेत या देखाव्यासाठी प्लायवुड,कार्डशिट पेपर,लेस,पुठ्ठा, चिकणमाती,वेगवेगळ्या कलरचा वापर केला आहे

या स्पर्धेत पुण्यासह महाराष्ट्रातील शहरांचा खूप मोठा सहभाग नोंदवण्यात आला. खरे तर ही स्पर्धा महाराष्ट्रापुरती मर्यादित असली तरी त्यात गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, दिल्ली आणि गोवा या राज्यांतूनही सहभाग वाढला असल्याचे पाहायला मिळाले.

पारंपारिक घटक,सौंदर्यात्मक सादरीकरण, हस्तकला आणि संकल्पनेचे वेगळेपण अशा काही प्रमुख मापदंडांवरून स्पर्धेचा निकाल ठरविण्यात आला.त्यानुसार स्पर्धकांनी त्यांच्या बाप्पाची सजावट करण्यासाठी रांगोळी, रंग आणि साहित्य यांसारख्या पारंपारिक साहित्याचा वापर केला. तसेच त्यात गोड आणि चवदार पदार्थांचा व्यापक वापर होता. काही सहभागींनी समुद्र मंथन, गणपतीचे नाव एकदंत कसे पडले इत्यादी संकल्पना साकार केल्या होत्या.

काही सहभागींनी देशातील केदारनाथ, सोन्याची जेजुरी आणि दगडूशेठ मंदिर यांसारखी विविध मंदिरे मांडली होती. बहुतांश सजावटीची दृश्ये हातांनी बनवलेली आहेत. त्यात सुतळीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केलं आहे त्यासह शेंगदाण्यांचे टरफले, शाडू माती आणि पर्यावरणास अनुकूल विविध साहित्य वापरून कौशल्य आणि सर्जनशीलता दाखविण्यात आली होती. सहभागींनी त्यांच्या सजावटीमध्ये लघुचित्रांचा वापर करून, शाहू पॅलेस नाट्यगृहाचे ध्वनी आणि दृश्य त्यासह, पुणे मेट्रोची सुरुवात झाली त्याचे दृश्य दाखवले आहेत. अशा विविध संकल्पानांचा वापर करून बाप्पांची सजावट केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
19.1 ° C
19.1 °
19.1 °
55 %
4.1kmh
20 %
Tue
25 °
Wed
26 °
Thu
23 °
Fri
24 °
Sat
23 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!