21.2 C
New Delhi
Sunday, February 9, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातील मंडळांना मिळाला 'अग्निसुरक्षित गणेश मंडळांचा' मान

पुण्यातील मंडळांना मिळाला ‘अग्निसुरक्षित गणेश मंडळांचा’ मान

पुणे अग्निशमन दल, “फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया” (एफएसएआय), सिटी कॉर्पोरेशन ली. अमेनोरा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन



पुणे : गणेशोत्सव पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. राज्यासह परराज्यातून भाविक उत्सवाच्या कालावधीत शहरात येतात. मंडपाच्या परिसरात आग लागणे, तसेच एखादी दुर्घटना घडल्यास मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून उपाययोजनेच्या दृष्टीने जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘अग्निसुरक्षित गणेश मंडळ’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच स्पर्धेत नवज्योत मित्र मंडळ, शनी मारुती बाल गणेश मित्र मंडळ, श्री आझाद मित्र मंडळ, आर १९ अड्रेनो कल्चरल कमिटी गणेश मंडळ अमेनोरा, पर्वती एकता मित्र मंडळ ट्रस्ट या पाच मंडळांना ‘अग्निसुरक्षित गणेश मंडळांचा’ मान मिळाला आहे.

पुणे अग्निशमन दल, “फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया” (एफएसएआय), सिटी कॉर्पोरेशन ली. अमेनोरा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १७० मंडळांनी सहभाग घेतला होता, त्यातील ४० मंडळे अंतिम फेरीत पोहचली व त्याचे परीक्षण होऊन त्यातील पाच विभागातील मंडळांना विजेते घोषित करण्यात आले. अमेनोरा फायर स्टेशन सभागृह येथे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

फोर्स वन चे पोलिस उपअधीक्षक संतोष गायके, एफएसएआय पुणे अध्यक्षा अर्चना गव्हाणे, सचिव सिंपल जैन, सिटी कॉर्पोरेशन ली. अमेनोराचे एमडी अनिरुद्ध देशपांडे, पुणे महानगर अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, प्रशांत गाईकर, जे.के. भोसले, सुनिल तरटे, मुख्य अग्निशमन अधिकारी जॉबी अब्राहम, एफएसएआय पुणेचे अमोल उंबरजे इ मान्यवर उपस्थित होते. पुणे अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.
सिंपल जैन यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर अमोल उंबरजे यांनी प्रस्तावना केली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट मंडळ यांना त्यांनी अग्नी व सुरक्षा बाबतीत घेतलेल्या उपाययोजना साठी त्यांना विशेष प्रेरणादायी गणेश मंडळ पुरस्कार प्रदान करण्यात आला. काही मंडळांनी विशेष असे पुढाकार घेतल्याने त्यांनाही विशेष पुढाकार सन्मान मंडळ असे पुरस्कार देण्यात आले. या मध्ये अखिल रामनगर मित्र मंडळ, कोकाटे तालीम मंडळ, डियेस्के विश्व गणेश मंडळ, नवरंग मित्र मंडळ हडपसर, शिवशक्ती मित्र मंडळ यांचा समावेश होता.

अर्चना गव्हाणे म्हणाल्या, गणेशोत्सव काळात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा गंभीर होत चालला आहे. पुण्यातील अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मंडपात एका वेळी दोन ते तीन हजार भाविक उपस्थित असतात. अशा वेळी आग लागल्याची घटना घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे उत्सवादरम्यान जर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर सरकारी यंत्रणांची मदत पोहोचेपर्यंत बचाव कार्य कसे करायचे ? याबाबत कार्यकर्ते प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. योग्य स्पॉटला सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, रोषणाई करताना केलेली वायरींगची तपासणी, आग विझवण्याच्या साधनांची तपासणी, आपत्कालीन वेळी बाहेर निघण्याची व्यवस्था , मेटल डिटेक्टर सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन परिस्थितीत उपाय करण्याचे मंडळातील कार्यकर्त्यांना मॉक ड्रील देणे अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन या स्पर्धेच्या वेळी एफएसएआय आणि पुणे अग्निशमन दलाकडून करण्यात आले.

पोलिस उपअधीक्षक संतोष गायके म्हणाले, हि स्पर्धा पुण्यात भरविण्यात आलेली असतानादेखील याला भरगोस प्रतिसाद मिळाला. एफएसएआय आणि पुणे अग्निशमन दलाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन हे कौतुकास्पद आहे. गणेश मंडळांतील कार्यकर्त्यांनी आपत्कालीन परिस्थिती कशी हातळायची याचे उत्स्फूर्तपणे प्रशिक्षण घेतले त्यामुळे भविष्यात समाजात काही अनुचित घटना घडल्यास हेच कार्यकर्ते प्रशासनास मदत करण्यास तत्पर असतील.

सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमेनोराचे जेके भोसले म्हणाले, खूप चांगला उपक्रम राबवित आहोत आणि अश्या जनजागृतीपर स्पर्धेसाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू.

ह्या स्पर्धेसाठी सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमेनोरा हे मुख्य प्रायोजक होते. संपूर्ण स्पर्धेचे आयोजन प्रशांत रणपिसे, किरण गावडे, अर्चना गव्हाणे, सिंपल जैन, जॉबी इब्राहिम, अमोल उंबरजे, शशांक कुलकर्णी, भूषण पाठक, मनोज घोगले, विनायक जोगळेकर, संदीप महादेवकर, सुजल शाह, अजित यादव, रियाज काझी, विनायक वाघमारे, आनंद गाडेकर, तेजल भोंगले, रवी जाधव, महेंद्र शेवाळे, पुणे व अमेनोरा अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांनी केले. यावेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अग्निशमन जवान, नागरिक, अग्नी व सुरक्षा यातील तज्ञ मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
21.2 ° C
21.2 °
21.2 °
14 %
2.3kmh
8 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!