पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातील शिवसेना भवनात या वर्षी एकतानगरीचा विघ्नहर्ता हा देखावा साकारण्यात आला आहे. एकतानगरी येथे मोठा महापूर आल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली होती त्यावेळी शिवसेना पक्षातर्फे करण्यात आलेल्या मदतीचा देखावा उभा करण्यात आला आहे.
जनतेचे मुख्यमंत्री ही ओळख असलेले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ठाणे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत पुरग्रस्त भागातील नागरिकांसाठी युद्ध पातळीवर राबवलेली स्वच्छता मोहीम, लष्कराच्या मदतीने केलेले बचाव कार्य l, शिवसेनेकडून त्यावेळी पुरग्रस्तांना देण्यात आलेली अन्नधान्याची मदत ,प्रशासनाबरोबर केलेले सहकार्य, तसेच जनतेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्याशी संवाद साधत पुरामुळे मोठ्या प्रमाणात नष्ट झालेली एकतानगरीतील युरो किडस् ही शाळा शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी पुन्हा नव्याने उभी केलेली शाळा ही यात दाखवलेली आहे.
