पुणे-लवकरच पीएमपीकडून डबल dubble decor busडेकरची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक डबल डेकर बसची खरेदी होणार आहे. पुण्यात डबल डेकर बस धावणार आणि त्या पीएमपीएमएलच्याच असणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले असून, यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरू आहे. यावरून पुणेकर आणि पिंपरी- चिंचवडकरांना लवकरच याद्वारे बसप्रवास करता येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पीएमपीच्या ताफ्यात १८८७ बस आहेत. पुणे(pune), पिंपरी-चिंचवड(pcmc) आणि पीएमआरडीए भागातील प्रवाशांची संख्या पाहता ती अतिशय कमी आहे.
त्या पार्श्वभूमीवर पीएमपी pmpl प्रशासन ताफ्यात आगामी काळात १०० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार आहे. त्यातील ८० बस १२ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बस असणार आहेत, तर यातील २० बस डवल डेकर असणार आहेत, असे पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले.
तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत ‘डबल डेकर’ ई-बस खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘डबल डेकर’ खरेदीला पीएमपी प्रशासनाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता प्रशासनाने लवकरात लवकर डबल डेकर बस आणाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
ताफ्यात दोन महिन्यांत ३६ इलेक्ट्रिक बस येणार पीएमपी प्रशासनाने यापूर्वी फेम योजनेंतर्गत ६५० इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या आहेत. त्यापैकी ४७३ बस पीएमपीच्या ताफ्यात यापूर्वीच आल्या आहेत. १७७ इलेक्ट्रिक बस येणे अजूनही बाकी आहे. यापैकीच जुलै महिन्यात १८ आणि पुढील जुलै महिन्यात १८ अशा एकूण ३६ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
नवीन येणारी डबल डेकर बस इलेक्ट्रिक असणार इलेक्ट्रिकमुळे शहरातील प्रदूषण रोखण्यास मदत इंधनाची बचत होणार एसीमुळे थंडगार प्रवास एकाच बसमधून दोन बसच्या क्षमतेच्या प्रवाशांची वाहतूक शक्य उत्पन्नात होणार वाढ प्रवाशांचे थांब्यांवरील वेटिंग कमी होणार शहराच्या विकासात भर पडणार