राज्य परिवहन महामंडळाकडून दर वर्षी दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता तसेच एसटीचे महसूल वाढवण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र यंदा दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दरवर्षी केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी १० टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळानं भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील नियमित प्रवाशांना तसेच दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान १० टक्के हंगामी भाडेवाढीसंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. एसटीची प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होती. मात्र, ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीसाठी हंगामी भाडेवाढ लागू नव्हती. हंगामी भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्यात आल्यानं महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारा अतिरिक्त महसूल यंदा मिळणार नाही. हंगामी भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्याचा प्रवास महागणार होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. महामंडळाने भाडेवाढ रद्द करत एसटीच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. राज्यभरातील प्रवाशांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.
New Delhi
fog
10.1
°
C
10.1
°
10.1
°
100 %
2.6kmh
100 %
Tue
22
°
Wed
22
°
Thu
19
°
Fri
22
°
Sat
20
°