30.4 C
New Delhi
Tuesday, July 8, 2025
Homeमहाराष्ट्रबळीराजा सुखावणार!

बळीराजा सुखावणार!

मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण योजनेची केली घोषणा

मुंबई- राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. अशातच आता नव्या वर्षात शेतकऱ्यांना सरकारकडून एक मोठी भेट दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ची घोषणा केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.महाराष्ट्र सरकारने नव्या वर्षात शेतकऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० ची घोषणा केली आहे. सौर उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतात, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या योजनेचा उद्देष शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज  उपलब्ध करुन देणे हा आहे. मुख्यमंत्री सौर कृषी फीडय योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी निरंतर सौर उर्जा मिळेल. राज्यात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी 16,000 मेगावॅट वीज देण्यात येते. गेल्या दोन वर्षात सर्व फीडर सौर उर्जेत बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले, ज्यात मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आणि इतर अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात उंब्रठा व नारंगवाडी गावातील शेतकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उंबरठा (जि. वाशिम) आणि नारंगवाडी (जि. धाराशिव) येथील सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी उंब्रठा आणि नारंगवाडी गावातील शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, सरकारच्या या उपक्रमाकडे गेम चेंजर म्हणून पाहिले जात आहे.

या योजनेच्या आधी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात अग्रेसर बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
30.4 ° C
30.4 °
30.4 °
71 %
1.7kmh
17 %
Tue
36 °
Wed
38 °
Thu
30 °
Fri
37 °
Sat
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!