27.4 C
New Delhi
Wednesday, July 16, 2025
Homeमहाराष्ट्रभारतातील पहिल्या संविधान भवनाची पायाभरणी

भारतातील पहिल्या संविधान भवनाची पायाभरणी

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात आणखी एक मानाचा तुरा

पिंपरी – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारतीय लोकशाहीचा पाया संविधान अर्थात राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा प्रचार, प्रसार आणि जनजागृती व्हावी. या करिता देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जात आहे. त्याची पायाभरणी आज झाली. संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांना अभिमान वाटावा, असे संविधान भवन उभारले जाईल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या पेठ क्रमांक 11 मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे, ⁠संतोष लोंढे, ⁠विलास मडिगेरी, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, हर्षवर्धन भन्ते, माजी नगरसेवक विकास डोळस, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, सागर आंघोळकर, बाबा त्रिभुवन, बाळासाहेब ओव्हाळ, आरपीआयचे शहराध्यक्ष  कुणाल व्हावळकर, बाळासाहेब भागवत, सखाराम बाप्पु डोळस,संदिपान झोबांडे, अजय निसर्गंध, कुंदन गायकवाड, चंद्रकांत डोळस, अमोल डोळस, भाऊसाहेब डोळस, विनोद (पिनु) डोळस, अनिकेत भुलाडे, अक्षय चव्हाण, प्रशांत बाराथे आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, शहरात 2019 मध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या माध्यमातून संविधान भवन उभारणीसाठी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर ‘पीसीएनटीडीए’चे विलिनीकरण पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणामध्ये करण्यात आले. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सदर प्रकल्प लांबणीवर पडला. महायुतीची सत्ता आल्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा या कामाला गती देण्यात आली. प्रस्तावित जागा ‘पीएमआरडीए’कडून महानरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडेही आम्ही पाठपुरावा केला. आता संविधान भवनाचे भूमिपूजन झाले आहे, याचे विशेष समाधान आहे.
**

पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब…
विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरीत होवून शहरात संविधान तथा राज्य घटनेचा प्रचार, प्रसार व्हावा. यासह जगभरातील लोकशाही देशाच्या घटनांचा अभ्यास करता यावा, असा संकल्प आहे. संविधान जागृती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी सूचना महापालिका प्रशासनाला केली होती. संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये साकारले जात आहे, ही आम्हा पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
27.4 ° C
27.4 °
27.4 °
68 %
4.1kmh
67 %
Tue
29 °
Wed
35 °
Thu
32 °
Fri
35 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!