30 C
New Delhi
Sunday, July 13, 2025
Homeमहाराष्ट्रमनीष आनंद निवडणूक रिंगणात!

मनीष आनंद निवडणूक रिंगणात!

हॉकी व बॉल या चिन्हावर लढविणार निवडणुक

पुणे- शिवाजीनगर मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मनीष आनंद बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मिळावी याकरिता त्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने मनीष आनंद यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने त्यांना हॉकी व बॉल हे चिन्ह दिले आहे.शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात बदल घडणार व हे बदल घडविण्यासाठी मनीष आनंद यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद आहे. आपण मतदारांच्या विनंतीला मान देऊन ही निवडणूक लढवीत असल्याचे मनीष आनंद यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हॉकी व बॉल या चिन्हावर मनीष आनंद निवडणूक रिंगणात रंगत आणतील तसेच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण बदलतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
30 ° C
30 °
30 °
63 %
1.6kmh
95 %
Sun
35 °
Mon
37 °
Tue
37 °
Wed
35 °
Thu
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!