26.1 C
New Delhi
Monday, December 2, 2024
Homeमहाराष्ट्रमहिलांनी लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहावे - डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांनी लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहावे – डॉ.नीलम गोऱ्हे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" शुभारंभ कार्यक्रम नियोजन आढावा बैठक संपन्न

पुणे – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ दि. १७ ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांचे उपस्थितीत करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाची आखणी व नियोजन करण्यासाठी दि. १० ऑगस्ट रोजी बालेवाडी क्रिडा संकुल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांत पाटील, महिला व बाल कल्याण मंत्री मा.श्रीमती.आदिती तटकरे, आमदार प्रसाद लाड या सर्व मान्यवरांनी बैठकीत नियोजनाचा आढावा घेतला.सदर कार्यक्रम सुरू होताच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांना हा कार्यक्रम स्क्रीन वर बघता येणार असल्याचे यावेळी मंत्री श्री.चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महत्वाकांक्षी योजना असून १७ तारखेच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचे आवाहन मंत्री श्रीमती.अदिती तटकरे यांनी केले आहे.याप्रसंगी बैठकीत बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांसाठी हे महत्वाचे पाऊल असून,या योजनेमुळे महिलांच्या समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे, यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत सांगितले.

पुणे जिल्ह्यात यावेळी सर्वात जास्त नोंदणी झाली असल्याची माहिती डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिली.त्यामुळे पुण्यातून जास्तीत जास्त संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे, आवाहन यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.१७ तारखेचा हा कार्यक्रम महायुती म्हणून आपण यशस्वी करून दाखवू, तसेच या कार्यक्रमासाठी एकत्र येऊन काम करू, तसेच काही अडचण आल्यास हेल्पलाईन वर संपर्क करण्याची सूचना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत दिली.यावेळी बैठकीला केंद्रीय मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांत पाटील, महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती.आदिती तटकरे, आमदार श्रीमती. उमा खापरे, आमदार श्री.महेशदादा लांडगे, आमदार श्री.प्रसाद लाड, आमदार श्री.सुनील टिंगरे, आमदार श्री. अनिकेत तटकरे,आमदार श्री.योगेश टिळेकर, मा.विजय शिवतारे यांच्यासह अनेक महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.याप्रसंगी बैठकीसाठी पुणे जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
26.1 ° C
26.1 °
26.1 °
34 %
2.6kmh
0 %
Mon
26 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
26 °
Fri
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!