27.4 C
New Delhi
Wednesday, July 16, 2025
Homeमहाराष्ट्रमालपाणी ग्रुपचे शिक्षण क्षेत्रात नवे पाऊल

मालपाणी ग्रुपचे शिक्षण क्षेत्रात नवे पाऊल

शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणा-या तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्यासाठी ध्रुव ग्लोबल स्कूल सज्ज…

पुणे- तंत्रज्ञानाच्या सजग उपयोगाने शिक्षण सरळ, सुगम आणि रूचीपूर्ण होते. हे सूत्र लक्षात ठेऊन ध्रुव ग्लोबल स्कूल ने बालवाडी पासून ते विद्यापीठस्तरापर्यंत पारंपरिक शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल करत आता नव तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा तसेच औंध व बाणेर येथे या वर्षापासून ध्रुव बालवाडीचे वर्ग सुरू करीत आहोत अशी घोषणा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शालेय संचालिका अनिष्का मालपाणी व मालपाणी ग्रुपचे संचालक यशोवर्धन मालपाणी यांनी पत्रकार परिषदेत केली.अनिष्का मालपाणी म्हणाल्या, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसाठी ओळखल्या जाणार्‍या मालपाणी ग्रुपच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षणात अनेक आनंददायी बदल केले आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना कल्पकतेने विचार करण्याऐवजी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी घोकंपट्टीवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे शिकविण्याची ही पद्धत बदलल्या नंतर आता त्याला नव तंत्रज्ञानाची वैशिष्टपूर्ण जोड दिली आहे.विद्यार्थ्यांनी स्वयंप्रज्ञेने विचार करावा. आपल्या मूल्यांची जपणूक करीत सखोल ज्ञान संपादन करत ते समाजातील सर्वच क्षेत्रात नेतृत्व करण्यास सज्ज असावे. अशा प्रकारचे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी मालपाणी ग्रुप ने तज्ज्ञांच्या मदतीने एक आराखडा तयार केला आहे. या नुसार प्रत्येक विद्यार्थी त्याच्या अभ्यासक्रमातील विषयांबरोबर कला, क्रीडा किंवा अन्य आवडीच्या विषयात कशा प्रकारे प्रगती करीत आहे, याची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपशीलवार नोंद ठेवली जाईल. यासाठी तयार केलेल्या या नव्या सॉफ्टवेअरमुळे प्रत्येक विद्यार्थ्याची केवळ विषयावरच नव्हे तर शैक्षणिक संकल्पनानिहाय सखोल माहितीचे विश्लेषण प्राप्त होणार आहे. त्यानुसारच शिक्षकांनी त्याच्या व्यक्तिगत गरजेनुसार शिकवता येईल.यशोवर्धन मालपाणी यांनी सांगितले की, ध्रुव ग्लोबल स्कूल भविष्यात नवी शाळा सुरू करण्याबरोबरच नवे विद्यापीठा सुरू करण्याचा विचार करीत आहोत. तसेच येणार्‍या काळात अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी व अध्ययन-अध्यापन पद्धतीत सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धीसाठी या क्षेत्रात चांगले काम करणार्‍यांसोबत भागीदारी करण्यासाठी इच्छुक आहोत. स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा या वर्षी सुरू केली आहे. तसेच औंध आणि बाणेर परिसरात या वर्षीपासून ध्रुव तर्फे बालवाडीचे नवीन वर्गही सुरू करीत आहोत.ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, क्रीडा व योगाच्या क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. याची दखल कॅलिफोर्निया, बोस्टनसारख्या जगातील शीर्ष विद्यापीठांनी घेतली आहे. ध्रुव ग्लोबल स्कूल ज्या पद्धतीने शैक्षणिक प्रयोग करीत आहेत त्याचा अनुभव घेण्यासाठी पालकांनी उंड्री व सूस येथील शैक्षणिक संकुलला भेट देण्यासाठी आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
27.4 ° C
27.4 °
27.4 °
68 %
4.1kmh
67 %
Tue
29 °
Wed
35 °
Thu
32 °
Fri
35 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!