32.3 C
New Delhi
Tuesday, April 22, 2025
Homeमहाराष्ट्रमोहोळ यांच्याकडे २४ कोटींची मालमत्ता

मोहोळ यांच्याकडे २४ कोटींची मालमत्ता

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. मोहोळ कुटुंबीयांवर १४ कोटी ८५ लाख ५७ हजार ८७७ रुपयांचे कर्ज आहे.मोहोळ यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे. मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे पाच कोटी २६ लाख ७६ हजार ७८८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर स्थावर मालमत्ता १९ कोटी पाच लाख ६७ हजार ६९५ रुपये अशी एकूण २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपयांची मालमत्ता आहे. मोहोळ यांच्यावर १३ कोटी ५८ लाख ६९ हजार ९७७ रुपये, तर पत्नीवर एक कोटी २६ लाख ८७ हजार ९०० रुपयांचे कर्ज आहे. मोहोळ यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मुठा, कासार आंबोली आणि भूगाव, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात येरूली येथे शेतजमीन आहे. पत्नीकडे मुळशी तालुक्यातील दासवे येथे शेतजमीन आहे. मोहोळ यांच्याकडे कोथरूडमध्ये चार, तर पत्नीकडे देखील कोथरूडमध्ये दोन वाणिज्यिक इमारती आहेत. मोहोळ यांच्याकडे कोथरूड येथे बंगला, कोथरूडमध्येच सदनिका आहे. मोहोळ यांनी शेती, व्यवसाय आणि भाडे यातून उत्पन्न मिळाल्याचे दाखविले आहे. मोहोळ यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
32.3 ° C
32.3 °
32.3 °
5 %
2.2kmh
1 %
Tue
40 °
Wed
41 °
Thu
42 °
Fri
43 °
Sat
43 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!