26.4 C
New Delhi
Wednesday, July 16, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात आठ जागांवर २०४ उमेदवार रिंगणात

राज्यात आठ जागांवर २०४ उमेदवार रिंगणात

मुंबई : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, निवडणूक आयोगाकडे परस्परांविरोधात तक्रारी यामुळे एकीकडे राजकीय हवा गरम झाली असताना सूर्यदेखील आग ओकतो आहे. अशा तापलेल्या वातावरणात राज्यातील आठ मतदारसंघांसह देशभरातील ८८ जागांसाठी आज, शुक्रवारी मतदान होणार आहे. राज्यात एकूण २०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आठापैकी सात मतदारसंघ कायम राखण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर असेल. वाढत्या उकाडय़ात मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे खडतर आव्हान राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना पार पाडावे लागणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील पाच तर मराठवाडय़ातील तीन मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यापैकी ठाकरे गटाकडे असलेल्या परभणीचा अपवाद वगळता ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलेल्या महायुतीसमोर सात जागा कायम राखण्याचे आव्हान आहे. महाविकास आघाडीने भाजप आणि महायुतीपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.  विदर्भ आणि मराठावाडय़ात वंचित बहुजन आघाडीचा कितपत प्रभाव पडतो यावरही बरीच समीकरणे अवलंबून असतील. आठही मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत चुरशीच्या लढती होणार आहेत. अकोला मतदारसंघात वंचितचे प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा आपले नशीब आजमवित आहेत. तिरंगी लढतीचा या मतदारसंघात कोणाला फायदा होतो याची उत्सुकता असेल. अमरावतीमध्ये महायुतीतच धुसफूस बघायला मिळाली. बच्चू कडू यांनी स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने त्याचा भाजपच्या नवनीत राणा यांना कितपत फटका बसतो का, यावर निकाल अवलंबून असेल. बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ-वाशीम या मतदारसंघांत दोन शिवसेनांमध्ये चुरशीच्या लढती बघायला मिळत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
75 %
4.8kmh
25 %
Tue
29 °
Wed
36 °
Thu
29 °
Fri
34 °
Sat
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!