विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे (Lighting on Vitthal temple on Kartik Ekadashi)
आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे.
१७ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मंदिर समितीचे प्रवेशद्वार, मंदिराचे शिखर, सात मजली दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे.
आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा दिवस वारकरी सांप्रदायासाठी प्रचंड आनंद आणि उत्साहाचा दिवस असतो. पंढरपुरात या दोन्ही दिवशी मोठी जत्रा भरते. हजारो भाविक पंढरपुरात दाखल होतात.आषाढी एकादशीच्या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या पंढरीत दाखल होत असतात.