36.1 C
New Delhi
Saturday, May 2, 2026
Homeमहाराष्ट्रविद्यापीठ चौकातील डबल डेकर फ्लायओव्हरची तपासणी सात दिवसांत

विद्यापीठ चौकातील डबल डेकर फ्लायओव्हरची तपासणी सात दिवसांत

पीएमआरडीए आयुक्तांचे आश्वासन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर फ्लायओव्हरच्या बाणेर रॅम्पमध्ये संभाव्य स्ट्रक्चरल त्रुटी असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील सात दिवसांत मुख्य अभियंता प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी दिले.
नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी या संदर्भात चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
विद्यापीठ चौकातील

पीएमआरडीएतर्फे उभारण्यात आलेल्या डबल डेकर फ्लायओव्हर प्रकल्पातील बाणेर रॅम्पचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प मानला जातो.
मात्र, रॅम्पच्या बांधकामातील एका भागाचे छायाचित्र समोर आल्यानंतर स्ट्रक्चरल जॉइंट नीट बंद न झाल्याची किंवा बांधकामाच्या गुणवत्तेत त्रुटी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकरणाची तात्काळ तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निम्हण यांनी केली आहे.

बाह्य स्वरूपातील दोषामुळे तात्काळ संरचनेला धोका निर्माण होईल असे नसले तरी जॉइंटमध्ये त्रुटी असल्यास दीर्घकालीन टिकाऊपणा आणि सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात संबंधित ठिकाणाचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, तसेच आवश्यक असल्यास आयआयटी, व्हीजेटीआय किंवा अन्य मान्यताप्राप्त तज्ज्ञ संस्थेकडून तृतीय पक्ष तपासणी करण्याची मागणीही निम्हण यांनी केली आहे.

दरम्यान, नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची निम्हण यांनी भेट घेत त्यांचे स्वागत केले. या वेळी चौधरी यांनी पुढील सात दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कार्यवाही करतील, असे आश्वासन दिले. तसेच आवश्यकतेनुसार आपण स्वतःही स्थळभेट देऊ, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
36.1 ° C
36.1 °
36.1 °
36 %
2.6kmh
20 %
Sat
40 °
Sun
43 °
Mon
40 °
Tue
39 °
Wed
37 °

Most Popular

Recent Comments