35 C
New Delhi
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रवीज कंत्राटी कामगारांचं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन

वीज कंत्राटी कामगारांचं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन

२४ ऑगस्ट पासून ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बेमुदत उपोषण करणार


पुणे- विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने कंत्राटी कामगारांनी आज पुण्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या महात्मा सोसायटीतील घरासमोर निदर्शने केली आपल्या प्रलंबित मागण्यासाठी गेले अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत मात्र शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे येत्या २४ ऑगस्ट पासून नागपूर येथे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे आंदोलकांनी दिला आहे , या वेळी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे उपमहामंत्री राहूल बोडके, संघटन मंत्री ऊमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार, उमेश विस्वाद, निखिल टेकवडे, वैभव कामठे, सौ अश्विनी भिलारे, किरण हंचाटे, विजया भगत यांनी नेतृत्व व मार्गदर्शन केले आहे.
या वेळी मा मंत्री महोदय यांचे स्विय सह्यायक यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ ही संघटना प्रयत्नशील आहे. या कामगारांना कंत्राटदार आणि वीज कंपनी प्रशासना कडून सातत्याने भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण करून कंत्राटी कामगार पद्धत कायम स्वरूपी बंद करून पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असतानाच्या शासन मान्यता प्राप्त रोजंदारी कामगार पद्धती (Nominal Muster Roll) द्वारे त्या काळात कंत्राटदार विरहित रोजगार दिला जात होता त्याच पद्धतीने आज रोजी महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीत वर्षानुवर्षे नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत
असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त वयाच्या ६० वर्षा पर्यंत शाश्वत रोजगार देण्यात येऊन त्यांना वीज कंपनीच्या रिक्त पदांवर सेवेत सामावून घ्यावे किंवा हरियाना राज्यात जसे हरियाना कौशल्य विकास निगम ची स्थापना करून त्या राज्यातील वीज कंत्राटी कामगारांना ज्या प्रकारे कंत्राटदारांच्या विळख्यातून मुक्त करून कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार देण्यात आला त्याच प्रमाणे अशा प्रकारची योजना ही महाराष्ट्रातील वीज उद्योगात सुरू करावी ही संघटनेची अनेक वर्षापासूनची मागणी केवळ धोरणात्मक निर्णयाची बाब म्हणून शासन दरबारी प्रलंबित आहे या मागणी बाबत ऊर्जामंत्री यांनी आचारसंहिता लागण्या पूर्वी धोरणात्मक निर्णय घेवून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली
दरम्यान मागण्यांबाबत सकरात्मक निर्णय न झाल्यास २४ ऑगस्ट २०२४ रोजी नागपूर येथील रेशीमबाग मैदान येथे तिन्ही वीज कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगार सकाळी १० वाजता एकत्र येऊन पायी मोर्चाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत . असा ईशारा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
35 ° C
35 °
35 °
54 %
1.6kmh
100 %
Thu
33 °
Fri
40 °
Sat
40 °
Sun
34 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!