12.1 C
New Delhi
Sunday, November 16, 2025
Homeमहाराष्ट्रशहरातील भगिनी सुरक्षेच्या मुद्द्यावर आमदार महेश लांडगे यांच्या शब्दामुळे ‘‘आश्वस्त’’!

शहरातील भगिनी सुरक्षेच्या मुद्द्यावर आमदार महेश लांडगे यांच्या शब्दामुळे ‘‘आश्वस्त’’!

शहरातील भगिनी सुरक्षेच्या मुद्द्यावर आमदार महेश लांडगे यांच्या शब्दामुळे ‘‘आश्वस्त’’!

पिंपरी -बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. अनेक माय माऊली घाबरल्या होत्या. शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलींबाबत काळजीत होत्या. त्यावेळी भोसरी मतदारसंघांमधील एकमेव व्यक्तीसमोर आली. ज्यांनी शहरातील तमाम भगिनींना आश्वस्त केले. “एकतर माझ्या शहरात अशी घटना घडूच देणार नाही, आणि चुकून जर माझ्या भगिनींना कोणत्याही प्रकारचा त्रास झालाच”तर भर चौकात अशा नराधमांना ठेचून काढील”. असे सांगणारी व्यक्ती म्हणजे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे होते. त्यांच्या एका वाक्याने आमच्या भगिनी निश्चित झाल्याचे चिखली टाळगाव मधील ग्रामस्थांनी सांगितले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली टाळगाव येथे ग्रामस्थांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मेळाव्यामध्ये ग्रामस्थांनी गेल्या दहा वर्षांतील बदल अधोरेखित करतानाच आमदार महेश लांडगे यांच्या ‘हट्टट्रीक’ साठी ग्रामस्थ सज्ज आहेत, असे सांगितले. ही निवडणूक समाविष्ट गावांच्या भविष्यातील नियोजनबद्ध, शाश्वत विकासासाठी येथील नागरिकांनी हातात घेतली आहे, असा विश्वास ग्रामस्थांनी दिला.
***

भाजपाच्या माध्यमातून राज्याचा विकास…
संवाद मेळाव्यामध्ये आपल्या भावना व्यक्त करताना ग्रामस्थांनी सांगितले की, भाजपाच्या माध्यमातून राज्याचा विकास होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या भागातून भाजपच्या शिलेदारांना अर्थात भाजपच्या उमेदवारीवर उभे असलेल्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे. यावेळी नागरिकांनी विरोधकांच्या उमेदवारीवर देखील बोट ठेवले. विरोधक कितीही फेक नेरेटिव्ह सेट करू द्या, आम्हाला माहित आहे आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत कोणते ”भगीरथ” प्रयत्न केले आहेत, अशा देखील भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
**


चिखली टाळगावमधील नागरिक ग्रामस्थांनी माझ्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्या माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तुम्हीच माझी ताकद आहात. असे कार्यकर्ते, त्यांचे निस्वार्थी प्रेम विकत घेऊन मिळत नसते. त्यांच्यासोबत मित्र म्हणून राहायला लागते, त्यांना आपले व्हिजन पटायला लागते तेव्हाच ते आपलेसे होतात. खोट्या आरोपांच्या जिवावर हे सहकारी मिळत नसतात आणि खोट्याच्या जीवावर निवडणूका लढवल्या जात नाहीत त्यासाठी व्हिजन लागते. खोट्या आरोपांचा भडिमार तुम्ही सुरू केलाय पण ज्या दिवशी मी सत्याची दवंडी पिटेन त्या दिवशी त्यांची पळता भुई थोडी होईल.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा,  भाजपा पिंपरी- चिंचवड.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
12.1 ° C
12.1 °
12.1 °
87 %
1.5kmh
0 %
Sun
27 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °
Thu
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!