42.9 C
New Delhi
Sunday, June 15, 2025
Homeमहाराष्ट्रसंविधानामुळेच देशातील लोकशाहीचा पाया मजबूत - शंकर जगताप

संविधानामुळेच देशातील लोकशाहीचा पाया मजबूत – शंकर जगताप

संविधान हे केवळ पुस्तक नाही तर देशाचा आत्मा – शंकर जगताप

सांगवीत संविधान दिन उत्साहात साजरा

सांगवी – संविधानाने आपल्या देशातील लोकशाहीचा पाया मजबूत केला आहे. संविधान हे पुस्तक नाही तर देशाचा आत्मा आहे, असे मत नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

सांगवी येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या संविधानातील प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करत सर्वांनी संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतली. त्यावेळी संविधान मस्तकाला लावून जगताप यांनी अभिवादन केले.

कार्यक्रमास ,माजी महापौर उषा तथा माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, प्रशांत शितोळे, शारदा सोनवणे, सुषमा तनपुरे, सागर अंगोळकर, दिलीप तनपुरे, दत्तात्रय यनपुरे, कांता भाऊ कांबळे, उज्वला ढोरे, सोनाली जम, जवाहर ढोरे, संतोष ढोरे, तृप्ती कांबळे, सीमा पाटोळे, सुरेश ढमाले, श्याम ढोरे, प्रीतम बालवडकर, अमोल गायकवाड, शाहरुख सय्यद, संदीप तांबे,, निमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, आपले संविधान हीच आपल्या लोकशाहीची ओळख आहे. या संविधानामुळेच देशात लोकांचे, लोकांनी व लोकांसाठी चालविलेली राज्य व्यवस्था अस्तित्वात आली आणि गेल्या ७५ वर्षांत ती चांगली रुजली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनतीने आणि दूरदृष्टीने आपले संविधान तयार केले. हे संविधान आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांसारख्या मूल्यांवर आधारलेले एक समान व सुदृढ समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवते.

आपल्या संविधानाने आपल्या देशाला लोकशाहीचा पाया दिला आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, आपले स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे, आणि प्रत्येक व्यक्तीला समानतेचा हक्क आहे, असे जगताप म्हणाले.

आजच्या दिवशी आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह ज्यांनी आपले संविधान तयार करण्यासाठी अथक प्रयत्न केले त्या सर्वांना आदरांजली वाहतो. आपल्याला संविधानाने दिलेली ही जबाबदारी आणि हक्क जपण्याची, देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची शपथ घेऊया, असे आवाहन आमदार जगताप यांनी या प्रसंगी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
42.9 ° C
42.9 °
42.9 °
36 %
0.7kmh
0 %
Sun
45 °
Mon
43 °
Tue
43 °
Wed
45 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!