पुणे, – “आईचे वाचन मुलांना कळेल ते इतके सोपे नसते. तिला अनुभवावी लागते. त्यांच्याकडे संस्काराचे वैभव असते. या वैभवाच्या शिदोरीवर ती मुलांचे चरित्र आणि चारित्र्याचे निर्माण करते. तीचे योगदान आणि समर्पण या दोन गोष्टीवर संपूर्ण मानव उभा राहतो. तिचे महत्व हे शब्दात सांगता येण्यासारखे नसते.” असे भावनात्मक विचार ८९ मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
शब्दाई प्रकाशन, पुणेतर्फे तत्त्वदर्शी प्रज्ञावंत कवयित्री आणि लेखिका वै. सौ.उर्मिला विश्वनाथ कराड लिखित ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’, ‘कीर्तनपुष्प’ आणि ‘समीर’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत हेाते.
या प्रसंगी प्रसिद्ध कवी व लेखक प्रा.इंद्रजित भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अभ्यासक उल्हास पवार हे हेाते. तसेच माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीच्या विश्वस्त पुनम आबासाहेब नागरगोजे, विश्वस्त प्रा.ज्योती अविनाश ढाकणे व शब्दाई प्रकाशाने संस्थापक प्रा.वि.दा. पिंगळे हे उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.“साहित्याच्या अंगाने परिपूर्ण असलेल्या लेखिका वै. उर्मिला विश्वनाथ कराड यांचे योगदान व समर्पणामुळे एमआयटीचा डोलारा उभा आहे. त्यांच्याकडे संस्काराची विवेकशीलता होती. त्यांनी संपूर्ण कुटुंबांचा नाही तर जागतिक शांततेचा इतिहास रचला आहे. विश्वशांती निर्मितीसाठी ते डॉ. कराड यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या.”
उल्हास पवार म्हणाले,“शब्द सामर्थ्यांने परिपूर्ण असेलेल्या लेखिका वै. उर्मिला कराड यांनी आयुष्यभर विनयशिलता आणि सहनशिलता जपल्या. विज्ञानाच्या युगात त्यांच्या घराण्याने आधुनिक आणि परंपरेची नाड जोडली आहे. यांच्याकडे संस्काराचे वैभव होते.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ वसुधैव कुटुम्बकमची संकल्पना आमच्या घरात आई वडिलांनी रुजवली. माझी आई कराड घराण्याचा दागिणा होता. तीचे अस्तित्व हे मनामनात रुजले आहे. त्या उच्च शिक्षित असून त्यांनी प्रत्येक गोष्टीवर गहन चिंतन असे आणि त्याला शब्दांची धार देत असे. आज त्यांच्याच पुस्तकांचे प्रकाशन होतांना आनंद होत आहे.”
इंद्रजीत भालेराव म्हणाले,“ खेड्यात रमलेले जीवन आणि आपल्या लेखनितून सतत गाव आणि तेथील वातावरण शब्द रूपात उतरविणार्या लेखिका वै. उर्मिलाताई या प्रचंड भावनिक होत्या. त्यांनी कराड परिवारातील संपूर्ण नवी पिढी संस्कारीत केली आहे. आज त्याच आधारे ही संस्था नावरूपास आली आहे”
यावेळी प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. संजय उपाध्ये, योगेश पाटील यांनी वै. सौ. उर्मिला वि. कराड यांच्या जुण्या आठवणिंना उजाळा दिला. या प्रसंगी डॉ. माधवी वैद्य यांचा संदेश वाचण्यात आला.
प्रकाशक वि.दा. पिंगळे यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. प्रतिमा जगताप यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती ढाकणे यांनी आभार मानले
समृध्द जीवनाचा पाया म्हणजे ‘आई’डॉ. श्रीपाल सबनीस यांचे विचार
कवयित्री वै. सौ.उर्मिला विश्वनाथ कराड लिखित तीन पुस्तकांचे एमआयटीत प्रकाशन
RELATED ARTICLES
New Delhi
haze
28.1
°
C
28.1
°
28.1
°
51 %
2.1kmh
1 %
Tue
32
°
Wed
32
°
Thu
32
°
Fri
32
°
Sat
32
°