32.1 C
New Delhi
Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रसाप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार कर संकलन  कार्यालये

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार कर संकलन  कार्यालये

नागरिकांच्या सोयीसाठी कर संकलन विभागाचा निर्णय

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन tax dept विभागाच्या वतीने कर वसुलीची कार्यवाही सुरु आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अर्थसंकप्लातील उद्दिष्टाप्रमाणे कर वसुली दि. ३१ मार्च २०२५ पुर्वी करणेची असून उपरोक्त उद्दिष्ट्यपुर्ततेकरीता केवळ १८ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. हीच बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुख्य कार्यालय तसेच १८ विभागीय कर संकलन कार्यालय यापुढे शनिवार व रविवार चालू ठेवणेचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवारी व रविवारी कर भरता येईल. पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी १८ विभागीय कार्यालये कार्यान्वीत असून कराचा भरणा करण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने कर भरण्याची सुविधा विभागीय कर संकलन कार्यलयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालेच्या pcmc विभागीय कर संकलन कार्यालयाचा तपशिल पुढीलप्रमाणे. आत्तापर्यंत ८३१ कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव करणे, यासारख्या कठोर कारवाया केल्या जात आहेत. नागरिकांना कर भऱण्याचे आवाहन करण्यासाठी करसंकलन विभागाकडून टेलिकॉलिंगच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे. नागरिकांनी शनिवारी व रविवारी महानगरपालिकेकडून ८८८८००६६६६ सदर क्रमांकावरुन आलेले फोन अधिकृत असून त्याचबरोबर, @CP-PCMCPT @CP-PCMCWT या हॅंडलवरुन आलेले एस.एम.एस अधिकृत समजावेत. असे कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. शनिवार आणि रविवार महापालिकेला सुट्टी असली तरी ३१ मार्चपर्यंत या दोन्ही दिवशी कर संकलन कार्यालये सुरुच ठेवण्यात येणार आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्यासाठी वेळ वाढविण्यात आली आहे. दि. ३१ मार्चपर्यंत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत कॅश काऊंटर सुरू ठेवण्यात येणार आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी करसंकलन विभागाचा निर्णय !
चालू आर्थिक वर्ष संपायला काहीच दिवस बाकी आहेत. करसंकलन विभागाकडून करवसुलीसाठी विविध माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील १८ विभागीय कार्यालये व कॅश काऊंटर्स साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुध्दा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील करदात्यांनी मालमत्ताकराचा भरणा करुन शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा.

  • प्रदीप जाभंळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
32.1 ° C
32.1 °
32.1 °
53 %
4kmh
91 %
Sat
32 °
Sun
38 °
Mon
33 °
Tue
36 °
Wed
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!