29.1 C
New Delhi
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्र१२ हजार ६१८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

१२ हजार ६१८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

पुणे महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ₹१२,६१८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असून, यामध्ये कोणतीही करवाढ प्रस्तावित नाही. पाणीमीटर प्रणाली, रस्ते सुधारणा आणि आरोग्य सेवेसाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी २०२५ – २०२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केला सादर

अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही.

– ⁠अर्थसंकल्पात

  • १. स्थानिक संस्था करातुन ५४५ कोटी
  • २. ⁠जीएसटी मधुन २ हजार ७०१ कोटी
  • ३. ⁠मिळकत करातुन २ हजार ८४७ कोटी
  • ४. ⁠बांधकाम विकास शुल्कातुन २ हजार ८९९ कोटी
  • ५. ⁠पाणीपट्टी मधुन ६१८ कोटी
  • ६. ⁠शासकीय अनुदान १ हजार ६३३ कोटी
  • ७. ⁠कर्ज रोखे ३०० कोटी
  • ८. ⁠इतर ९७५ कोटी रुपये जमा होणार आहेत.

पुणेकरांना आगामी वर्षात मीटर प्रमाणे पाणी वापराचे बील द्यावे लागणार आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली आहे. पुणे महापालिकेनं समान पाणीपुरवठ्याची योजना राबवली आहे. त्याचे काम जवळपास पुर्ण होत आले आहे. त्यामुळे आगामी वर्षात पुणेकरांना पाण्याचं बील मीटर प्रमाणे द्यावे लागणार आहे ⁠पुराचा फटका बसलेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी मधील घरांचे पुनर्वसन महापालिका करणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे.

महापालिका आगामी वर्षात

  • १. इमारतींच्या बांधकामासाठी ४९० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे
  • २. ⁠रस्त्यांसाठी १ हजार १२६ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे
  • ३. ⁠नदी सुधारणा योजनेसाठी ३९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
  • ४. ⁠आरोग्यासाठी ५६९ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे
  • ५. ⁠पाणीपुरवठ्यासाठी १ हजार ६६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे
  • ६. ⁠घनकचरा व्यवस्थापनासाठी १४२ कोटींची तरतूद केली आहे
  • ७. ⁠महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांसाठी ६२३ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.1 ° C
29.1 °
29.1 °
26 %
4.6kmh
0 %
Tue
32 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
36 °
Sat
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!