31.5 C
New Delhi
Saturday, June 13, 2026
Homeमहाराष्ट्रमहावितरण वकील पॅनल वरती अँड. संजय सावंत (पाटील) यांची कायदेशीर सल्लागार...

महावितरण वकील पॅनल वरती अँड. संजय सावंत (पाटील) यांची कायदेशीर सल्लागार पदी निवड..

पुणे:- नुकतीच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ( MSEDCL) पुणे विभाग वकील पॅनल वर अँड. संजय दत्तात्रय सावंत यांची सल्लागार पदी निवड करण्यात आली. महावितरण ( MSEDCL) यांनी वकील पॅनल करीता ठरवून दिलेल्या अटी व नियमांची पूर्तता अँड संजय सावंत यांनी अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्राद्वारे करण्यात आली. महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी सर्व कागदपत्राची पडताळणी करून गेली अँड सावंत यांचा अनेक वर्षाचा कामाचा अनुभव पाहून एकमताने ठराव मंजूर करून महावितरणच्या ( MSEDCL) वकील पॅनल वरती अँड. संजय सावंत (पाटील) यांची कायदेशीर सल्लागार पदी आधिकृतपणे निवड करण्यात आली.

अँड संजय सावंत पाटील यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित (PDCC BANK), जगदंब सामाजिक प्रतिष्ठान, येसूबाई सामाजिक प्रतिष्ठान या सर्व ठिकाणी जवळपास 4 वर्ष पेक्षा जास्त वर्ष कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात मध्ये असलेल्या पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वरती मोफत कायदेशीर सल्लागार म्हणून देखील कार्यरत आहेत. अँड. सावंत हे गेली अनेक वर्षे पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात अनेक वर्षे वकीली व्यवसाय करत आहेत.

अँड सावंत यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था, शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, बँक, कंपनी यांची कामे पहिली आहेत तसेच कोटुंबिक दावे, धर्मदाय आयुक्त दावे, लेबर कोर्ट दावे, महसूल दावे, सिव्हिल दावे आणि क्रिमिनल दावे अशा स्वरूपाचे वकिली व्यवसायातील सर्व प्रकारच्या कामाचा अनुभवाची दखल घेऊन महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकारी साहेब यांनी अँड. संजय सावंत (पाटील) यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ( MSEDCL) वरती कायदा (विधी) विभाग मध्ये वकील पॅनेल वरती कायदेशीर सल्लागार म्हणून निवड केलेली आहे. यासंदर्भात पुणे विभागाचे अधिकारी लीगल अँडव्हायजर (I/C) असलेल्या मा.सौ,नितल हसे मॅडम यांच्या मार्फत आधिकृत पत्र देण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महावितरणचे अधिकारी, सौ. प्राजक्ता कदम मॅडम तसेच आधी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

महावितरणच्या पॅनल अँडव्होकेट म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अँड. संजय दत्तात्रय सावंत (पाटील) यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड चे महाराष्ट्र राज्याचे संचालक मा. श्री. राजेंद्र पवार साहेब, वरिष्ठ अधिकारी (CLA) असलेले मा. आर.आर. गांधी साहेब, पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता मा.श्री. सुनिल काकडे साहेब, असिस्टंट लॉ ऑफिसर असलेले मा. श्री. दिनकर तिडके सर, पुणे विभागाचे अधिकारी लीगल अँडव्हायजर (I/C) असलेल्या मा.सौ. नितल हसे मॅडम आणि महावितरण कार्यालयचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे विशेष जाहीर आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
31.5 ° C
31.5 °
31.5 °
46 %
3.2kmh
3 %
Sat
38 °
Sun
41 °
Mon
38 °
Tue
40 °
Wed
43 °

Most Popular

Recent Comments