28.1 C
New Delhi
Saturday, May 2, 2026
Homeमहाराष्ट्रपिंपळे सौदागरमधील रखडलेला ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्ता मार्गी

पिंपळे सौदागरमधील रखडलेला ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्ता मार्गी

काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात

PUNE | पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीचा कळीचा मुद्दा ठरलेला आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्ता अखेर मार्गी लागला असून, १८ मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

पिंपळे सौदागरच्या मध्यवर्ती भागातून जाणारा हा रस्ता परिसरातील विविध गृहप्रकल्पांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. मात्र, जमीन अधिग्रहणातील अडचणी, तांत्रिक बाबी आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. परिणामी नागरिकांना धुळीचा त्रास, खड्डे आणि सततची वाहतूक कोंडी सहन करावी लागत होती.

या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिताताई काटे आणि नगरसेविका कुंदाताई भिसे यांच्या प्रयत्नांतून हे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे.

या कामाच्या प्रारंभप्रसंगी बोलताना शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. “हा रस्ता केवळ पायाभूत सुविधा नसून परिसराच्या दळणवळणाची जीवनरेखा आहे. अनेक अडथळ्यांनंतरही सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम सुरू करता आले,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, कामाची गुणवत्ता राखून ते जलदगतीने पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

रस्ता अर्धवट राहिल्यामुळे परिसरातील रहिवाशांना दैनंदिन हालचालींमध्ये अडथळे येत होते. विशेषतः पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत होता. आता काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने या समस्यांपासून लवकरच दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या प्रकल्पामुळे पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून, स्थानिक पातळीवर विकासाला गती मिळणार आहे. तसेच, परिसर ‘स्मार्ट’ शहराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

कामाच्या शुभारंभप्रसंगी स्थानिक उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील सोसायट्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवाशांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
28.1 ° C
28.1 °
28.1 °
61 %
3.1kmh
2 %
Fri
32 °
Sat
41 °
Sun
42 °
Mon
40 °
Tue
38 °

Most Popular

Recent Comments