41.8 C
New Delhi
Thursday, July 16, 2026
Homeमहाराष्ट्रज्ञानेश्र्वरीतील हिरे शोधण्यासाठी चिंतनाची दृष्टी हवी : डॉ. भावार्थ देखणे

ज्ञानेश्र्वरीतील हिरे शोधण्यासाठी चिंतनाची दृष्टी हवी : डॉ. भावार्थ देखणे

पुणे : महाराष्ट्राला संतांची देदिप्यमान परंपरा लाभली आहे. संपूर्ण वारकरी संप्रदायात ज्ञानोबा ते तुकोबा आणि पुढे निळोबा या परंपरेचे पाईक संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज आहेत. ज्ञानेश्र्वर माऊलींनी समतेचा आणि मराठी सारस्वताचा पाया रचला. ज्ञानेश्र्वरी ही हिऱ्यांची खाण आहे. अनेक हिरे ज्ञानेश्र्वरीत आहेत, परंतु ते शोधण्यासाठी आपल्याला चिंतनाची दृष्टी असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. भावार्थ देखणे यांनी केले.
पुणे महिला मंडळातर्फे डॉ. भावार्थ देखणे यांच्या ‘ज्ञानेश्र्वरी सात शतकांचे विद्यापीठ’ या विषयावर निरूपण आयोजित करण्यात आले होते. पर्वती पायथा येथील संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. सुरुवातीस पुणे महिला मंडळाच्या अध्यक्षा केतकी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची माहिती देत डॉ. भावार्थ देखणे यांचा सत्कार केला. उल्का शहा, स्मिता इनामदार, वैशाली देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘माझा मराठीचा बोलू कौतुके परि अमृता तेही पैजा जिंके’ असे म्हणत माऊलींनी भावविभोर शब्दरचना व अलंकारांनी ज्ञानेश्र्वरीची रचना केली. या हृदयाला भिडणाऱ्या शब्दांचा सोहळा डॉ. भावार्थ देखणे यांनी या वेळी साकारला. ते पुढे म्हणाले, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेले संस्कृत भाषेतील श्रीमद्‌ भगवत गीतेतील गहन ज्ञान ज्ञानेश्र्वरीच्या रूपात संत ज्ञानेश्र्वर माऊलींनी जनमानसापर्यंत सोप्या मराठी भाषेत पोहोचविले. ज्ञानेश्र्वरीतील रसालंकारसंपन्न भाषेने साहित्यिकांना, भक्तिवैराग्याच्या कथनाने वारकऱ्यां

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
41.8 ° C
41.8 °
41.8 °
23 %
5kmh
30 %
Thu
42 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
37 °

Most Popular

Recent Comments