28.1 C
New Delhi
Thursday, April 30, 2026
Homeमहाराष्ट्रप्रत्येक महिलेने दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी राखून ठेवत छंद जोपासावेत –...

प्रत्येक महिलेने दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी राखून ठेवत छंद जोपासावेत – उपमहापौर बाबर

विविध कार्यक्रमांद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

पिंपरी, – महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याकडे आणि वैयक्तिक आयुष्याकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कामाच्या धकाधकीत अनेकदा महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात, मात्र निरोगी शरीर आणि सकारात्मक मन असेल तरच त्या कुटुंब, समाज आणि कार्यस्थळी अधिक सक्षमपणे योगदान देऊ शकतात. त्यामुळे महिलांनी आपल्या दैनंदिन दिनक्रमात आरोग्याची काळजी घेणे, नियमित व्यायाम करणे आणि मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिलेने दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी राखून ठेवत आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवावा. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी ऊर्जा आणि सकारात्मकता मिळू शकेल, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मनोगत व्यक्त करताना उपमहापौर शर्मिला बाबर बोलत होत्या.

या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, पल्लवी वाल्हेकर,प्रियांका कुदळे यांच्यासह सहआयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उपआयुक्त चेतना केरूरे, संदीप खोत, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिका महिला अधिकारी,महिला कार्यकारी अभियंता तसेच कर्मचारी उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
28.1 ° C
28.1 °
28.1 °
47 %
2.6kmh
20 %
Thu
39 °
Fri
39 °
Sat
42 °
Sun
42 °
Mon
36 °

Most Popular

Recent Comments