22.1 C
New Delhi
Thursday, February 6, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानअॅमेझॉन इंडियाने डिलिव्‍हरी असोसिएट्ससाठी सुरू केला सर्वसमावेशक सुरक्षितता व वेलनेस उपक्रम

अॅमेझॉन इंडियाने डिलिव्‍हरी असोसिएट्ससाठी सुरू केला सर्वसमावेशक सुरक्षितता व वेलनेस उपक्रम

पुणे : असोसिएटचे स्‍वास्‍थ्‍य उत्तम राखण्‍याप्रती कटिबद्धता अधिक दृढ करत अॅमेझॉन इंडियाने डायल ४२४२ सोबत सहयोगाने डिलिव्‍हरी असोसिएट्ससाठी रूग्‍णवाहिका सेवा सुरू केल्‍या आहेत. हा उपक्रम सुरक्षितता उपाययोजनांमध्‍ये वाढ करतो आणि डिलिव्‍हरी असोसिएट्सच्‍या आरोग्‍याला प्राधान्‍य देतो. तसेच, अॅमेझॉनने सर्वसमावेशक ६-महिन्‍यांची आरोग्‍य मोहिम सुरू केली आहे, ज्‍यामुळे डिलिव्‍हरी सर्विस पार्टनर व त्‍यांचे डिलिव्‍हरी असोसिएट्स, आय हॅव स्‍पेस आणि फ्लेक्‍स प्रोग्राम्‍समधील ५०,००० हून अधिक असोसिएट्सना फायदा होईल.

या मोहिमेचा डिलिव्‍हरी असोसिएट्सना मोफत आरोग्‍य तपासणी, तसेच डोळे व दात तपासणी सेवा देण्‍याचा मनसुबा आहे, जेथे डिलिव्‍हरी असोसिएट्समध्‍ये त्‍यांचे सुरू असलेले सर्वसमावेशक आरोग्‍य व अपघात कव्‍हरेज, तसेच महिला डिलिव्‍हरी असोसिएट्ससाठी मॅटर्निटी कव्‍हर याबाबत जागरूकता निर्माण करण्‍यात येईल. या प्रबळ प्रयत्‍नांमधून डिलिव्‍हरी असोसिएट्ससाठी सुरक्षित व सहाय्यक वातावरण निर्माण करण्‍याप्रती अॅमेझॉनची समर्पितता दिसून येते. आवश्‍यक वैद्यकीय सेवा उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेत आणि सर्वांगीण स्‍वास्‍थ्‍याला प्राधान्‍य देत अॅमेझॉन संपूर्ण भारतातील डिलिव्‍हरी असोसिएट्सना सक्षम व सुरक्षित करण्याप्रती कटिबद्ध आहे.

डिलिव्‍हरी असोसिएटच्‍या स्‍वास्‍थ्‍याप्रती कटिबद्धतेला अधिक दृढ करत रूग्‍णवाहिका सेवा रस्‍त्‍यावर प्रवास करताना डिलिव्‍हरी असोसिएट्सची सुरक्षितता व स्‍वास्‍थ्‍यामध्‍ये वाढ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली. ही सेवा आपत्‍कालीन स्थितींमध्‍ये त्‍वरित वैद्यकीय प्रतिसादासाठी गरजेची पूर्तता करते, ज्‍यामधून रस्‍त्‍यावर अपघातानंतर सुरूवातीच्‍या महत्त्वपूर्ण तासांदरम्‍यान वेळेवर मदतीची खात्री मिळते आणि डायल ४२४२च्‍या संपूर्ण भारतातील नेटवर्कमध्‍ये उपलब्‍ध असेल. याशिवाय, नुकतेच सुरू करण्‍यात आलेल्‍या आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य मोहिमेसह ही सेवा आरोग्‍यसंबंधित समस्‍यांचे लवकर निदान होण्‍याला चालना देईल, ज्‍यामुळे दीर्धकालीन आरोग्‍य पद्धतींबाबत जागरूकतेचा प्रसार होईल आणि डिलिव्‍हरी असोसिएट्सना विम्‍याचे फायदे, तसेच मॅटर्निटी सपोर्टबाबत माहिती मिळेल.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत भारतातील अॅमेझॉन लॉजिस्टिक्‍सच्‍या उपाध्‍यक्ष डॉ. करूणा शंकर पांडे म्‍हणाल्‍या, ”अॅमेझॉनचे फ्रण्‍टलाइन डिलिव्‍हरी कर्मचारीवर्ग आमच्‍या कार्यसंचालनांचे महत्त्वपूर्ण भाग आहेत. आम्‍ही नेहमी त्‍यांची सुरक्षितता व स्‍वास्‍थ्‍याला प्राधान्‍य देऊ. डायल ४२४२ सोबत सहयोगाने समर्पित रूग्‍णवाहिका सेवा सुरू करणे हे आपत्‍कालीन स्थितींमध्ये त्‍वरित वैद्यकीय सेवा उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. यामधून डिलिव्‍हरी असोसिएट्सना ते ग्राहकांना सेवा देण्‍यासाठी रस्‍त्‍यावर प्रवास करत असताना उच्‍चस्‍तरीय केअर आणि त्‍यांच्‍या कुटुंबांना मन:शांतीची खात्री मिळेल. या उपक्रमाला पूरक आमची सर्वसमावेशक ६-महिन्‍यांची आरोग्‍य मोहिम आहे, जी प्रतिबंधात्‍मक केअर, लवकर निदान आणि दीर्घकालीन स्‍वास्‍थ्‍य पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित करते.

डायल ४२४२ चे सह-संस्‍थापक जीतेंद्र लालवानी म्‍हणाले, ”आम्‍हाला संपूर्ण भारतातील डिलिव्‍हरी असोसिएट्सना आमच्‍या सुलभ व विश्‍वसनीय रूग्‍णवाहिका सेवा देण्‍यासाठी अॅमेझॉन इंडियासोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगामधून वेळेवर वैद्यकीय साह्य देत डिलिव्‍हरी कर्मचारीवर्गाची सुरक्षितता आणि स्‍वास्‍थ्‍याची खात्री घेण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आमच्‍या प्रबळ आपत्‍कालीन प्रतिसाद नेटवर्कसह आम्‍ही डिलिव्‍हरी असोसिएट्ससाठी सुरक्षित आणि अधिक विश्‍वसनीय कामाच्‍या वातावरणाप्रती योगदान देण्‍यास कटिबद्ध आहोत.”

डिलिव्‍हरी असोसिएट्स त्‍यांच्‍या अॅपवर सिंगल क्लिकसह रूग्‍णवाहिका सेवांचा लाभ घेऊ शकतात, डायल ४२४२ सह ते त्‍वरित लास्‍ट माइल इमर्जन्‍सी टीम आणि एलएमईटीशी कनेक्‍ट होऊ शकतील. ही विनामूल्‍य आपत्‍कालीन प्रतिसाद सेवा आहे, तसेच घटनेची नोंद होताच त्‍वरित समर्पित हॉटलाइन प्रक्रिया सुरू होते आणि जवळच उपलब्‍ध असलेल्‍या रूग्‍णवाहिकेसह बेसिक व अॅडवान्‍स्‍ड लाइफ सपोर्ट पर्याय दिले जातात. अॅमेझॉन सबस्क्रिप्‍शन खर्चाव्‍यतिरिक्‍त रूग्‍णवाहिका वापरासाठी होणारा खर्च देईल. याला पूरक म्‍हणून अॅमेझॉनची नवीन आरोग्‍य व स्‍वास्थ मोहिम आरोग्‍यसंबंधित समस्‍यांचे लवकर निदान, दीर्घकालीन स्‍वास्‍थ्‍याला चालना आणि विम्‍याच्‍या फायद्यांबाबत जागरूकता निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित करते. या उपक्रमामध्‍ये ई-कार्ड वितरण, पर्यवेक्षक-नेतृत्वित जागरूकता सत्रे आणि दिल्‍ली, हैदराबाद, चेन्‍नई, चंदिगड व जयपूर अशा शहरांमध्‍ये आगामी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन यांचा समावेश आहे. तसेच हा उपक्रम अधिक ठिकाणी विस्‍तारित करण्‍याची योजना देखील आहे.

अॅमेझॉन इंडिया प्रोजेक्‍ट आश्रय सारख्‍या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून आपल्‍या डिलिव्‍हरी असोसिएट्सच्‍या स्‍वास्थाप्रती कटिबद्धता दृढ करत आहे. प्रोजेक्‍ट आश्रय इकोसिस्‍टममधील डिलिव्‍हरी असोसिएट्सना आराम करण्‍याच्‍या समर्पित गंतव्‍यांची सेवा देतो, ज्‍यामध्‍ये आरामदायी व सहाय्यक वातावरणासाठी आवश्‍यक सुविधा आहेत. तसेच, प्रतिनिधी स्‍कॉलरशिप उपक्रम डिलिव्‍हरी असोसिएट्सच्‍या १,२०० विद्यार्थ्‍यांना आर्थिक साह्य देतो आणि विकलांगत्‍व असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना अधिक सपोर्ट देतो. सणासुदीच्‍या काळासाठी तयारीचा भाग म्‍हणून अॅमेझॉन इंडियाने मुंबई, दिल्‍ली आणि बेंगळुरू अशा प्रमुख शहरांमध्‍ये ११०,००० हून अधिक हंगामी रोजगार संधी निर्माण केल्‍या आहेत. कंपनीने हजारो महिला आणि जवळपास १,९०० विकलांगत्‍व असलेल्‍या असोसिएट्सना नियुक्‍त केले आहे, ज्‍यामधून वैविध्‍यता आणि कार्यरत सर्वोत्तमतेप्रती त्‍यांची समर्पितता दिसून येते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
22.1 ° C
22.1 °
22.1 °
24 %
4.6kmh
0 %
Thu
22 °
Fri
24 °
Sat
26 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!