पुणे, : अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीने भारतातील पहिली व एकमेव बहुभाषिक डिझाइन प्रवेश परीक्षा ‘अनंत डिझाइन एण्ट्रान्स अँड प्रोफिशिएन्सी टेस्ट एडीईपीटी’ इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम व पंजाबी या १० भाषांमध्ये आयोजित करण्यात येण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमामधून सर्वसमावेशकता आणि डिझाइन शिक्षण उपलब्धतेचे लोकशाहीकरण करण्याप्रती अनंतची अविरत कटिबद्धता दिसून येते, ज्यामुळे विविध सांस्कृतिक व भाषिक पार्श्वभूमींमधील महत्त्वाकांक्षी डिझाइनर्सना समान संधींची खात्री मिळते. एडीईपीटी २६ जानेवारी २०२५ रोजी ऑनलाइन आयोजित करण्यात येईल.
गेल्या वर्षी, अनंतने पाच भाषांमध्ये एडीईपीटी सादर करत उल्लेखनीय दर्जा स्थापित केला. अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष श्री. अजय पिरामल यांचे तत्त्व ‘डिझाइन भाषेपलीकडे जाते’ यामधून प्रेरित या उपक्रमाचा भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी अडथळ्यांना दूर करत संधींचे दरवाजे खुले करण्याचा मनसुबा होता. २०२८ चा बी.डिझाइन क्लास युनिव्हर्सिटीच्या इतिहासामधील सर्वात मोठा क्लास ठरत या उपक्रमाचे यश दिसून आले, ज्यामध्ये ४ राष्ट्रीयत्व, भारतातील ३० राज्ये व २८३ शहरांमधील ४७८ विद्यार्थी एकत्र आले.
या यशाला अधिक दृढ करत अनंत यंदा १० भाषांमध्ये एडीईपीटी सादर करत मोठे पाऊल उचलत आहे. या विस्तारीकरणामधून वैविध्यपूर्ण व सर्वसमावेशक अध्ययन वातावरणाला चालना देण्याप्रती अनंतचा दृष्टिकोन दिसून येतो, जेथे विद्यार्थी त्यांची आवड जोपासू शकतात आणि डिझाइनच्या माध्यमातून समाजाप्रती अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात. अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रोवोस्ट डॉ. अनुनय चौबे म्हणाले, ”आमचे सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची ध्येय आहे, जेथे टॅलेंट भाषिक मर्यादांना दूर करत प्रगती करेल. एडीईपीटीला १० भाषांमध्ये विस्तारित करत आम्ही विविध पार्श्वभूमींमधील विद्यार्थ्यांना सक्षम करत आहोत, तसेच त्यांना त्यांचे अद्वितीय दृष्टिकोन व संकल्पना डिझाइन इनोव्हेशनमध्ये आणण्यास सुसज्ज करत आहोत.”
या उपक्रमासह युनिव्हर्सिटी डिझाइन शिक्षणामध्ये नवीन मापदंड स्थापित करत आहे, तसेच जागतिक आव्हानांचे निराकरण करण्यास सुसज्ज प्रभाव-केंद्रित डिझाइनर्सच्या नवीन पिढीला घडवत आहे. अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीला नुकतेच गुजरात स्टेट इन्स्टिट्यूशनल रेटिंग फ्रेमवर्क (जीएसआयआरएफ) २०२३-२४ येथे आर्किटेक्चर श्रेणीमध्ये प्रतिष्ठित ‘५-स्टार रेटिंग’ आणि युनिव्हर्सिटी श्रेणीमध्ये ‘४-स्टार रेटिंग’सह सन्मानित करण्यात आले. या सन्मानासह जागतिक दर्जाची व सर्वोत्तम संस्था निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीकडून १० विभिन्न भाषांमध्ये एडीईपीटी परीक्षांचा विस्तार
अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीने भारतातील पहिली व एकमेव बहुभाषिक डिझाइन प्रवेश परीक्षा ‘अनंत डिझाइन एण्ट्रान्स अँड प्रोफिशिएन्सी टेस्ट एडीईपीटी’ इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम व पंजाबी या १० भाषांमध्ये आयोजित करण्यात येण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमामधून सर्वसमावेशकता आणि डिझाइन शिक्षण उपलब्धतेचे लोकशाहीकरण करण्याप्रती अनंतची अविरत कटिबद्धता दिसून येते, ज्यामुळे विविध सांस्कृतिक व भाषिक पार्श्वभूमींमधील महत्त्वाकांक्षी डिझाइनर्सना समान संधींची खात्री मिळते. एडीईपीटी २६ जानेवारी २०२५ रोजी ऑनलाइन आयोजित करण्यात येईल.
गेल्या वर्षी, अनंतने पाच भाषांमध्ये एडीईपीटी सादर करत उल्लेखनीय दर्जा स्थापित केला. अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष श्री. अजय पिरामल यांचे तत्त्व ‘डिझाइन भाषेपलीकडे जाते’ यामधून प्रेरित या उपक्रमाचा भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी अडथळ्यांना दूर करत संधींचे दरवाजे खुले करण्याचा मनसुबा होता. २०२८ चा बी.डिझाइन क्लास युनिव्हर्सिटीच्या इतिहासामधील सर्वात मोठा क्लास ठरत या उपक्रमाचे यश दिसून आले, ज्यामध्ये ४ राष्ट्रीयत्व, भारतातील ३० राज्ये व २८३ शहरांमधील ४७८ विद्यार्थी एकत्र आले.
या यशाला अधिक दृढ करत अनंत यंदा १० भाषांमध्ये एडीईपीटी सादर करत मोठे पाऊल उचलत आहे. या विस्तारीकरणामधून वैविध्यपूर्ण व सर्वसमावेशक अध्ययन वातावरणाला चालना देण्याप्रती अनंतचा दृष्टिकोन दिसून येतो, जेथे विद्यार्थी त्यांची आवड जोपासू शकतात आणि डिझाइनच्या माध्यमातून समाजाप्रती अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात. अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रोवोस्ट डॉ. अनुनय चौबे म्हणाले, ”आमचे सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची ध्येय आहे, जेथे टॅलेंट भाषिक मर्यादांना दूर करत प्रगती करेल. एडीईपीटीला १० भाषांमध्ये विस्तारित करत आम्ही विविध पार्श्वभूमींमधील विद्यार्थ्यांना सक्षम करत आहोत, तसेच त्यांना त्यांचे अद्वितीय दृष्टिकोन व संकल्पना डिझाइन इनोव्हेशनमध्ये आणण्यास सुसज्ज करत आहोत.”
या उपक्रमासह युनिव्हर्सिटी डिझाइन शिक्षणामध्ये नवीन मापदंड स्थापित करत आहे, तसेच जागतिक आव्हानांचे निराकरण करण्यास सुसज्ज प्रभाव-केंद्रित डिझाइनर्सच्या नवीन पिढीला घडवत आहे. अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीला नुकतेच गुजरात स्टेट इन्स्टिट्यूशनल रेटिंग फ्रेमवर्क (जीएसआयआरएफ) २०२३-२४ येथे आर्किटेक्चर श्रेणीमध्ये प्रतिष्ठित ‘५-स्टार रेटिंग’ आणि युनिव्हर्सिटी श्रेणीमध्ये ‘४-स्टार रेटिंग’सह सन्मानित करण्यात आले. या सन्मानासह जागतिक दर्जाची व सर्वोत्तम संस्था निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.