30.3 C
New Delhi
Friday, July 4, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानएडेलवाईस मुच्यूअल फंडातर्फे गुंतवणूकदारांसाठी ‘एडेलवाईस कंझम्शन फंड’

एडेलवाईस मुच्यूअल फंडातर्फे गुंतवणूकदारांसाठी ‘एडेलवाईस कंझम्शन फंड’


नवीन फंड ऑफर (एनएफओ) गुंतवणूकीसाठी ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान खुली
ठळक वैशिष्ट्ये:
· २०३० पयत ग्राहकांचा खच ४.३ ट्रिलीयन डॉलरवर पोहण्याच्या अपेक्षेमुळे हा फंड भारतातील ग्राहकपयोगी वस्तू बाजारपेठेतील मुख्य, उगवत्या आणि चक्रीय प्रवाहावर आधारित संकल्पनेवर आपले लक्ष केंद्रीत करणार
· विशिष्ट गुंतवणूक शैलीवर विसंबून न राहता हा फंड ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील दिग्गज कंपन्या, सतत वृध्दी दर्शविणाऱ्या दर्जेदार कंपन्या आणि मूल्य संधी प्रदान करणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करत जाणार
· हालातील बाजार सुधारांमुळे आकर्षक प्रवेश बिंदू उपलब्ध झाले आहेत, कारण ग्राहक संबंधित स्टॉकच्या किमतीत महत्त्वपूर्ण घट झाली आहे
पुणे : एडेलवाईस अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडने (EAMC/EMF) गुंतवणूकदारांसाठी ‘एडेलवाईस कंझम्पशन फंड’ हा नवीन फंड आणला आहे. नवीन फंड ऑफर (एनएफओ) ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीदरम्यान गुंतवणूकीसाठी खुली राहणार आहे. वापर आणि उपभोग-संबंधित क्षेत्रांमध्ये किंवा संबंधित क्षेत्रांमध्ये कार्यरत कंपन्यांवर हा फंड आपले लक्ष केंद्रित करताना प्रामुख्याने समभाग आणि समभागाशी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करत गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवलवृध्दीचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना एडेलवाईस म्युच्यूअल फंडाच्या एमडी आणि सीईओ श्रीमती राधिका गुप्ता म्हणाल्या, “जगातील दोन प्रमुख ग्राहक बाजारपेठांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतातील ग्राहकपयोगी वस्तू उपभोगाच्या बाजारपेठेत आगामी काळात अतिशय वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. ग्राहकांचे वाढते उत्पन्न, शहरीकरण, डिजिटलायझेशन, सुलभरित्या उपलब्ध होणारे कर्ज आणि लोकसंख्येत तरुणांचा अधिक संख्या यासारख्या लाभदायक घटकांमुळे ग्राहकरुपी व्यवसाय भारतात वेगाने भरभराटीला येण्यासाठी सज्ज झालेला आहे. त्यामुळे पुढील अनेक दशकांच्या लाभ उठविण्याचे उद्दिष्ट एडलवाईस कंझम्पशन फंडाने ठेवलेले आहे. भारतीय शेअरबाजारात समभागांच्या किंमती सुधारुन योग्य पातळीवर आलेल्या असल्याने हा फंड अतिशय योग्य वेळी सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी या क्षेत्रातील समभागांत प्रवेशासाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे.”
दरडोई उत्पन्नात वाढ झाल्याने भारताची अर्थव्यवस्था सध्या ग्राहकपयोगी वस्तू खपांच्या लाटेवर स्वार झालेली असून त्यामुळे ग्राहकांशी संबंधित व्यवसायांमध्ये वृध्दी होत चालली आहे. ग्राहक वस्तू उपभोगामुळे भारताच्या वाढीच्या या टप्प्याचा लाभ उठवण्यासाठी मुख्य, उगवत्या आणि चक्रीय प्रवाहाशी संबंधित व्यवसायांमध्ये गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी प्रामुख्याने हा एडेलवाईस कंझम्पशन फंड तयार करण्यात आलेला आहे. एफएमसीजी, ग्राहकपयोगी वस्तू, दैनंदिन आहाराशई निगडीत वस्तू, शिक्षण, आरोग्य आदी ग्राहकांशी संबंधित उपविभागांमध्ये गुंतवणूक करत हा फंड आपल्या गुंतवणूकीत विविधांगी दृष्टीकोन राखणार आहे. गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत संपत्ती निर्मितीच्या संधी प्रदान करणे, हे या फंडाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
‘एडेलवाईस कंझम्पशन फंड समभाग निवडीसाठी विशिष्ट गुंतवणूक शैलीला चिकटून राहणार नाही. आपल्या क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या कंपन्या, सतत विकास साधणाऱ्या कंपन्या आणि मूल्य निवड या दृष्टीकोनातून हा फंड गुंतवणूकीसाठी कंपन्यांवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. हा फंड भारतातील विविधांगी ग्राहकपयोगी वस्तूंच्या विस्तारणाऱ्या बाजारपेठेचा फायदा उठविताना निवडीसाठी निश्चित केलेले निकष पूर्ण करणाऱ्या व्यवसायांची निवड करुन त्यातच गुंतवणूक करत जाणार आहे. फंडाची क्षेत्रनिहाय आणि संकल्पनानिहाय गुंतवणूक भारताच्या आर्थिक लवचिकता आणि विकसित होत असलेल्या ग्राहकांच्या पसंतींशी सुसंगत राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा फंड आशादायक गुंतवणूकीचा एक मार्ग राहणार आहे.
विविध श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी हा फंड गुंतवणूकीसाठी सहज उपलब्ध असून यात अगदी १०० रुपयांच्या किमान गुंतवणूकीने त्यांना शुभारंभ करता येणार आहे. भारतातील ग्राहकपयोगी वस्तूंशी संबंधित बाजारपेठ संकल्पनेवर आपले लक्ष केंद्रीत करणाऱ्या समभागरुपी गुंतवणूक पर्यायाच्या माध्यमातून आपल्या पोर्टफोलिओत वैविध्यता हव्या असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड उत्तम पर्याय राहणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन श्री. ध्रुव भाटीया, श्री. त्रिदीप भट्टाचार्य आणि श्री. अमित व्होरा हे सांभाळणार आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
30.3 ° C
30.3 °
30.3 °
70 %
3.6kmh
94 %
Fri
38 °
Sat
42 °
Sun
37 °
Mon
36 °
Tue
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!